​‘सैराट’ची पुनरावृत्ती पाकिस्तानातही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 15:43 IST2016-06-09T10:13:49+5:302016-06-09T15:43:49+5:30

आवडलेल्या मुलासोबत लग्न केल्याने एका मुलीला तिच्या आई व भावाने पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना पाकिस्तानात घडली आहे.  घरासमोर ...

'Sarat' repeated in Pakistan ... | ​‘सैराट’ची पुनरावृत्ती पाकिस्तानातही...

​‘सैराट’ची पुनरावृत्ती पाकिस्तानातही...

डलेल्या मुलासोबत लग्न केल्याने एका मुलीला तिच्या आई व भावाने पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना पाकिस्तानात घडली आहे. 

घरासमोर राहणाऱ्या हसन नावाच्या मुलावर जीनत नावाच्या तरुणीचं प्रेम होतं. मुलीने याबाबत घरी सांगितलं पण त्यांना हे मान्य नव्हतं. त्यामुळे आईने आणि भावाने तिची जाळून हत्या केल्याची कबुली आईने दिली आहे. पण यामध्ये मुलाचा हात नसल्याचं तिचं म्हणणं आहे. पोलिसांनी तरुणीच्या आईला अटक केली असून तिचा भाऊ मात्र फरार आहे.

समाजात आपली प्रतिष्ठा मलिन होऊ नये व ती जपण्यासाठी गेल्या वर्षात पाकिस्तानमध्ये ८०० महिलांची हत्या झाली होती. या प्रकरणाच्या कसून चौकशीचे आदेश तेथील मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

Web Title: 'Sarat' repeated in Pakistan ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.