सैराट उत्तरपत्रिका..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2016 14:17 IST2016-08-01T08:47:13+5:302016-08-01T14:17:13+5:30

नागराज मंजुळेंच्या 'सैराट' चित्रपटाने मराठी माणसांच्या मनावर अक्षरश: गारुड निर्माण केले आहे. तीन महिन्यानंतरही 'सैराट'ची क्रेज जसीच्या तशी आहे. ...

Sarat North Book ..! | सैराट उत्तरपत्रिका..!

सैराट उत्तरपत्रिका..!

class="summaryarticledetail" style="word-wrap: break-word; color: rgb(0, 0, 0); font-family: Mangal; font-weight: bold; line-height: normal; float: left; width: 649px; clear: both; margin-left: 11px; font-size: 17px;">

आता या चित्रपटाचे शाळकरी मुलानांही याड लागले आहे. या चित्रपटातील कलाकार रातोरात स्टार झाले व तरुण-तरुणींच्या गळ्यातील स्टार झाले. आता तर हे कलाकार शालेय परिक्षांच्या उत्तरपत्रिकेतही निबंध लेखन, संवाद लेखन या माध्यामातून अवतरत आहेत. या चित्रपटाचा मुलांच्या मनावर किती प्रभाव पडला आहे याचे प्रत्यंतर खालील घटनेवरून येते. 

सध्या प्राथमिक शाळांत तिमाही परीक्षा घेतल्या जात आहेत. चौथीच्या प्रश्नपत्रिकेत चित्रावरून एक गोष्ट लिहा असा ५ गुणांचा एक प्रश्न विचारण्यात आला होता. तर एका सैराट विद्यार्थ्यांने या गोष्टीत सैराट चित्रपटातील पात्रांना घेतले व खूपच रंजक गोष्ट लिहिली. 

या विद्यार्थ्याने चित्रावरून अशी गोष्ट तयार केली की -
शाळेची घंटा वाजली, शाळा सुटली
आर्ची, परशा, स्वराज, लंगड्या व सलीम हे सर्वजण घराकडे निघाली.
घरी जात असतानाच मुसळधार पाऊस सुरू झाला. स्वराज एकटाच एका छत्रीत होता तर आर्ची व परशा एका छत्रीत आणि सलीम व लंगड्या एका छत्रीत होते. 
रस्त्यावरून चालत असताना परशा पाय घसरुन पडला. 
परशा - मला उचल, (आर्चीने परशाला उचलले)
आर्ची - परशा लागलं काय रे.
परशा - हो थोडंसं लागलं.
आर्ची - तू घरी जा व कपडे बदलून ये. मी तुला औषध लावते. आर्ची परशाला औषध लावते. त्यानंतर सर्वजण आपआपल्या घरी जातात.


सध्या ही उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आणि विशेष म्हणजे शिक्षकांनी या उत्तराला ५ पैकी ४ गुण दिले आहेत. त्यामुळे त्या शिक्षकावरही सैराटची किती प्रभाव आहे याची प्रचिती येते.    

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपट इतका सुपरडुपर हिट झाला, की या सिनेमाने आजपर्यंत मराठी सिनेमातील सर्व विक्रम धुळीस मिळवले. या चित्रपटाची कमाई १०० कोटीच्या वर गेली आहे. या चित्रपटातील कलाकारांनाही या चित्रपटाने रातोरात स्टार केले आहे. रिंकु आणि आकाशला तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनवले आहे.
सैराट चित्रपटाची भुरळ अमराठी प्रेक्षकांना जशी पडली आहे तशी अमराठी सेलेब्रिटीजनाही पडली आहे. रवीश कुमारने एनडीटीव्हीवर प्राईम टाईममध्ये नागराजची घेतलेली मुलाखत, हिंदी रेडिओ चॅनलवर सैराटच्या टीमचे होणारे स्वागत, कपील शर्माच्या शोमध्ये सैराटच्या टीमने घातलेले झिंगाट यामुळे हिंदी प्रेक्षकांचा ओढाही सैराटकडे वळला आहे.

बॉलीवूड स्टार आमिर खान, इरफान खान, आयुष्यमान खुराणा यांनी चित्रपट पाहिला आणि सैराट टीमवर कौतुकाचा वर्षाव केला. अनुराग कश्यपनेही चित्रपटाला दाद दिली आणि त्यानंतर बॉलिवूडमध्येही सैराटची हवा झाली. बॉलिवूडमध्ये तर सैराट पाहिला का ?  असा सवाल एकमेकांना सेलेब्रिटी करताना दिसत आहेत. आता तर परिक्षेत उत्तरेही सैराट पद्धतीने लिहिली जात आहेत. 

Web Title: Sarat North Book ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.