पोकेमॉनच्या शोधात कलाकार देखील झाले सैराट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 12:35 IST2016-07-28T08:53:16+5:302016-10-20T12:35:24+5:30
Exculsive - बेनझीर जमादार सध्या संपूर्ण जग फक्त एकच वाक्य उच्चारत आहे. ते ...

पोकेमॉनच्या शोधात कलाकार देखील झाले सैराट
सध्या संपूर्ण जग फक्त एकच वाक्य उच्चारत आहे. ते म्हणजे पोकेमॉन गो. याच गेमने संपूर्ण जगाला याडं लावल आहे. जो तो पोकेमॉनच्या शोधात आहे. काहीजणांना या गेमची इतकी झिंग चढलेली दिसत आहे की, ते आॅफीसला, महाविदयालयाला दांडी मारून पोकेमॉनचा शोध घेत आहे. तर दुसरीकडे पोकेमॉनची प्रसिध्दी पाहता, थोर-मोठे लोकदेखील पोकेमॉनचा गेम जाणून घेण्यास उत्सुक आहेत. यात आपले मराठी कलाकार देखील कसे मागे राहतील. म्हणूनच पोकेमॉन गो या गेमने प्रेक्षकांचे लाडके कलाकार देखील सैराट झालेले आहे.
संस्कृती बालगुडे: माझ्या बालपणी पोकेमॉन हे कार्टून मला फार आवडायचे. त्यातील पिंकाचूं हे कार्टून तर फेव्हरेट होते. त्यामुळे हा गेम डाउनलोड करण्याची उत्सुकता होती. माझा लहान भाऊ तर या गेममध्ये माहीर आहे. त्यामुळे साहिजकच त्याच्याकडून या गेमचे धडे घेतले असे म्हणण्यास हरकत नाही. ही एक रियालिटी गेम आहे. जिथे जाईन तिथे तुम्हाला पोकेमॅन दिसत असतो. अक्षरश: लोकं तर या गेमविषयी वेडे झाले आहेत. पण या गेमपायी कित्येक लोक आपला जीव देखील धोक्यात घालत असल्याचे दिसत आहे. पण ही वाईट गोष्ट आहे. एखादी गोष्ट मनोरंजनासाठी खेळावी पण त्याच्या आहारी जावू नये.
सत्या मांजरेकर : लहानपणी पोकेमॉन या कार्टूनचे मला खूप वेड लागले होते. पण आता हेच कार्टून खेळाच्या स्वरूपात प्रत्यक्षात भेटत आहे. त्यामुळे पुन्हा लहानपणीच्या त्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. हा गेम खेळताना खूप एन्जॉय करतो. तसेच कधी न चालणारा मी या पोकेमॉनच्या बहाण्याने चालायला लागलो. सध्या आगामी चित्रपटातील डान्सची रिअसर्ल सुरू आहे. त्यामुळे रिअसर्ल दरम्यान ब्रेक मिळाला तर पहिले लक्ष मोबाईलमध्ये जाते. आतापर्यत माझ्याकडे २५ च्यावर पोकेमॉन मिळाले आहेत. आता, मी आकाश ठोसरला ही पोकेमॉन शिकविणार आहे.
पार्थ भालेराव : पार्थ भालेराव याने भूतनाथ रिटर्न्स या चित्रपटातून बिग बी यांच्यासोबत रूपेरी पडदा गाजविला आहे. तसेच त्याच्या डिस्को सन्या या आगामी चित्रपटाची चर्चादेखील चालू आहे. या वंडर किडलापण पोकेमॉनचे वेड लागलेलं दिसत आहे. पार्थ म्हणतो, सध्या डिस्को सन्या या चित्रपटाचे प्रमोशन सुरू आहे. त्यामुळे मला कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, सांगली, पुणे अशा अनेक ठिकाणी पोकेमॉन पकडण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे मी जाम खूश आहे. आतापर्यती मी ६० च्या वर पोकेमॉन पकडले आहे.
शुभम मोरे: हाफ तिकीट या चित्रपटातून प्रेक्षकांचा लाडका बनलेल्या शुभम मोरेला देखील पोकेमॉनचं झिंग चढलेली आहे. शुभम म्हणतो, लहान असल्यामुळे पालकांच्या परवानगी शिवाय मी सोसायटीच्या बाहेर ही जावू शकत नाही. त्यामुळे माझ्या आस-पास जितके पॉकेमॉन असतील तितकेच शोधण्याचा मी प्रयत्न करत असतो. हा गेम खेळण्यास खूप मजा येते. पण पॉकेमॉन शोधण्यासाठी मला बाहेर जायला मिळत नाही याचे वाईट देखील वाटते.
शुभम केरोडियन: महेश मांजरेकर यांच्या आगामी एफ्यू या चित्रपटात शुभम केरोडियन झळकणार आहे. पोकेमॉन या क्रेझी खेळाविषयी बोलताना शुभम म्हणाला, पोकेमॉन हा ओपन वर्ल्ड असल्यामुळे खूप चालावे लागते. एक दिवस तर मी पोकेमॉन खेळताना घरापासून खूप लांब गेलो होतो. पोकेमॉन देखील अनएक्सपेकटेंड ठिकाणी असतात. त्यामुळे त्याच्या शोधात खूप फिरावे लागते. कधी ही न चालणारे आम्ही मित्र आता पोकेमॉनमुळे चालू लागलो आहोत. चला, गेमच्या बहाण्याने तरी आमचा चालण्याचा व्यायाम होतो. त्याचबरोबर कोणाला ही विचारा, मोबाईलमध्ये काय चालू आहे? उत्तर एकच मिळतं पोकेमॉन गो.