'स्पर्धा करू नका'; गोविंदा पथकांना संतोष जुवेकरचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 01:00 PM2022-08-18T13:00:00+5:302022-08-18T13:00:00+5:30

Santosh juvekar: सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकामध्ये दहीहांडीचा उत्साह दिसत असून अभिनेता संतोष जुवेकरने गोपाळांसाठी म्हणजेच गोविंदा पथकांसाठी एक महत्त्वाची पोस्ट लिहिली आहे.

santosh juvekar appealed to the govinda pathak for dahi handi | 'स्पर्धा करू नका'; गोविंदा पथकांना संतोष जुवेकरचं आवाहन

'स्पर्धा करू नका'; गोविंदा पथकांना संतोष जुवेकरचं आवाहन

googlenewsNext

श्रावण महिन्यात अनेक मोठमोठे सण, उत्सव साजरे केले जातात. त्यातलाच एक उत्सव म्हणजे गोकुळाष्टमी. मुंबईमध्ये मोठ्या उत्साहात हा गोकुळाष्टमी आणि दहीहांडी साजरी केली जाते. मागील दोन वर्ष संपूर्ण देशावर कोरोनाचं संकट असल्यामुळे हा उत्सवाचा रंग फिका पडला होता. मात्र, २ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता त्याच जोशाने पुन्हा एकदा हा उत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळेच सध्या सगळ्या गोपाळांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकामध्ये दहीहांडीचा उत्साह दिसत असून अभिनेता संतोष जुवेकरने (santosh juvekar) गोपाळांसाठी म्हणजेच गोविंदा पथकांसाठी एक महत्त्वाची पोस्ट लिहिली आहे.

"२ दिवसांवर गोपाळ अष्टमी आलीये. गेली दोन वर्ष हा गोपाळ काला उत्सव साजरा करता नाही आला कारण covid च संकट तीव्र प्रमाणात होत पण ह्या वर्षी ह्या उत्सवाचा जोर आणि जोश काही औरच असणार आहे सगळेच गोपाळ आणि गोपिका दही हंडी फोडण्याची जोरात तयारी करतायत कस्सून सराव चालाय. कालच माझे खूप जवळचे मित्र श्री मनोज चव्हाण दादांमुळे महाराष्ट्रातल गाजलेल्या जय जवान गोविंदा पथक जोगेश्वरी (मुंबई ) ह्यांची practic बघण्याची संधी मिळाली क्या बात मित्रांनो आणि मैत्रिणींनो जोमात अहात सगळे तुम्ही. एक क्षण वाटलं आपण पण घुसावं पण इतकं सोप्प नाही ते लगेच जाणवलं", असं संतोष म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "माझ्या तुम्हाला आणि सगळ्या गोविंदा पाथकांना खूप खूप शुभेच्छा आणि एक विनंती  मित्रांनो कृपया करून स्वतःची आणि तुमच्या सोबत येणाऱ्या मुलींची आणि लहान मुलांची काळजी घ्या दहीहंडी हा सण आहे आपला तो सणा सारखाच साजरा करा त्याची स्पर्धा करू नका. जोश असुदे पण सोबतीला होशही असूदेत. बाकी आपले #maharashtrapolice आहेतच आपल्या मदतीला आणि आवलीगीरी करणार्यांना फटके द्यायला. मज्जा करा आणि काळजी घ्या रे."

दरम्यान, सध्याच्या काळात दहीहांडी फोडण्यासाठी गोविंदा पथक मोठमोठे थर लावतात. त्यामुळे अनेकदा अपघातही घडतात. त्यामुळेच स्वत:ची आणि इतरांची काळजी घ्या असं सांगणारी संतोषची ही पोस्ट व्हायरल होत आहे. संतोष मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ यासारख्या मराठी चित्रपटात दमदार भूमिका साकारुन त्याने लोकप्रियता मिळवली आहे.

Web Title: santosh juvekar appealed to the govinda pathak for dahi handi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.