संस्कृती बालगुडेने मसकली स्टाईलमध्ये केलं फोटोशूट, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 14:02 IST2019-12-19T14:01:22+5:302019-12-19T14:02:11+5:30

संस्कृतीने नुकतेच सोशल मीडियावर एक फोटोशूट शेअर केले आहे.

Sanskruti Balgude shared picture in masakali style, see her pics | संस्कृती बालगुडेने मसकली स्टाईलमध्ये केलं फोटोशूट, पहा तिचे फोटो

संस्कृती बालगुडेने मसकली स्टाईलमध्ये केलं फोटोशूट, पहा तिचे फोटो

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. नुकतेच तिने व्हाईट रंगाच्या गेटअपमधील फोटो शेअर केले आहेत.

संस्कृतीने नुकतेच सोशल मीडियावर एक फोटोशूट शेअर केले आहे. यात संस्कृती खूप ग्लॅमरस आणि हॉट दिसतेय. हा फोटो शेअर करून संस्कृतीने ..बस ठान ले तू जान ले, केह सना नाना नाना हवा.. मसकली मस मस मसकली, उड़ मटक मटक मटकली..!! असं कॅप्शन दिले आहे.


 तिच्या या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.. तिचे सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टाईलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.



'सांगतो ऐका' या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृतीचे विविध सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत.


संस्कृती शेवटची 'सर्व लाइन व्यस्त आहेत' या चित्रपटात दिसली होती.या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला.



या सिनेमात संस्कृती व्यतिरिक्त सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, महेश मांजरेकर, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी, राणी अग्रवाल, कमलाकर सातपुते, माधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर, हितेश संपत आणि गौरव मोरे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.



 

Web Title: Sanskruti Balgude shared picture in masakali style, see her pics