शरद पोंक्षेंनी घेतलेल्या 'त्या' निर्णयावर संकर्षण कऱ्हाडेची प्रतिक्रिया; म्हणाला, 'हे फार धाडसाचं काम..'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 05:00 PM2024-01-28T17:00:39+5:302024-01-28T17:01:14+5:30

Sankarshan karhade: नेमकं संकर्षणने का केलंय शरद पोंक्षेंचं कौतुक?

sankarshan-karhade-comment-after-sharad-ponkshe-stop-mi-nathuram-godse-boltoy-drama-show-share-video | शरद पोंक्षेंनी घेतलेल्या 'त्या' निर्णयावर संकर्षण कऱ्हाडेची प्रतिक्रिया; म्हणाला, 'हे फार धाडसाचं काम..'

शरद पोंक्षेंनी घेतलेल्या 'त्या' निर्णयावर संकर्षण कऱ्हाडेची प्रतिक्रिया; म्हणाला, 'हे फार धाडसाचं काम..'

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे (sankarshan karhade). उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या संकर्षणचं त्याच्या कामावर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे नाटक, मालिका यांसारख्या सगळ्याच क्षेत्रात त्याचा सक्रीय वावर आहे. संकर्षणचं नाटकावर विशेष प्रेम आहे. आणि, त्याचं हे नाट्यप्रेम वेळेवेळी दिसूनही येतं. त्यामुळेच त्याने नुकतंच अभिनेता शरद पोंक्षे यांच्याविषयी आणि त्यांच्या 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाविषयी एक पोस्ट शेअर केली आहे.

संकर्षण सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे तो कायम नवनवीन पोस्ट शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळी त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्याने 'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे नाटक बंद झाल्यामुळे त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला संकर्षण?

"नमस्कार माझं नाव संकर्षण कऱ्हाडे, मी हा व्हिडिओ नथुराम गोडसे या नाटकाच्या संपूर्ण टीमसाठी आणि शरद पोंक्षे सर यांच्यासाठी करत आहे. तुम्ही आज हे नाटक ही कलाकृती पूर्ण करताय.. थांबवताय, संपवताय असं मी चुकूनही म्हणणार नाही. तुम्ही आज ही कलाकृती पूर्ण करताय आणि याच्यानंतर या कलाकृतीचे प्रयोग आम्हाला बघायला मिळणार नाही, हे फार धाडसाचे काम आहे. लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत असताना एखादी कलाकृती पूर्ण करणं, तिला पूर्णविराम देणं हे धाडसाचं काम आहे", असं संकर्षण म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "एरव्ही आपण शुभारंभाच्या प्रयोगाच्या शुभेच्छा देतो, तेही महत्त्वाचे आहे. एकवेळ शुभारंभाचा प्रयोग तुलनेने सोपा, पण उदंड प्रतिसादाच्या महासागरात एखादा प्रयोग पूर्ण करणं आणि तो पुन्हा न करणं हे जास्त अवघड आहे. या चिकाटीबद्दल या धाडसाबद्दल तुम्हा सर्वांना मनापासून नमस्कार, तुमच्या टीमला सलाम. त्यातील काही लोकांना मी जवळून ओळखतो. यात राजेश कांबळे, घाटे सर, पोंक्षे सर तर अर्थात आहेतच. तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन. ही कलाकृती आता जरी पूर्ण होत असली तरी वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून आम्हाला भेटत राहा. या संपूर्ण टीमला माझा मनापासून नमस्कार आणि अनंत शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी...."

दरम्यान, संकर्षणचा हा व्हिडीओ शरद पोंक्षे यांनीही त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.  "संकर्षण किती सुंदर प्रतिक्रीया दिलीस मित्रा धन्यवाद", असं म्हणत शरद पोंक्षे यांनीही त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

Web Title: sankarshan-karhade-comment-after-sharad-ponkshe-stop-mi-nathuram-godse-boltoy-drama-show-share-video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.