​संजय शेजवळ शिल्पकाराच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2017 17:10 IST2017-03-11T11:20:06+5:302017-03-11T17:10:27+5:30

कलाकाराने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक कलाकार एकाच साच्यातील भूमिका न साकारता वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्याचा ...

Sanjay Shejwal plays a sculptor | ​संजय शेजवळ शिल्पकाराच्या भूमिकेत

​संजय शेजवळ शिल्पकाराच्या भूमिकेत

ाकाराने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक कलाकार एकाच साच्यातील भूमिका न साकारता वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्याचा प्रयत्न करत असतो. संजय शेजवळने आजवर खूपच मराठी चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्याने सगळ्याच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत आणि या त्याच्या भूमिकांचे प्रेक्षकांनी कौतुकदेखील केलेले आहे. लक्ष्मी... तुझ्याविना या चित्रपटात त्याने काम केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत प्रेमा किरण, सई रानडे झळकले होते. तसेच सौभाग्य माझे दैवत, प्रेम पहिलं वाहिलं या चित्रपटातही त्याने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. आता तो एका नव्या चित्रपटात झळकणार असून या चित्रपटात तो एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा त्याची ही वेगळी भूमिका असणार आहे. 
ताटवा हा एक मराठी चित्रपट लवकरच येणार असून त्याचे चित्रीकरण सध्या जोरात सुरू आहे. या चित्रपटात संजय प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा तो नायक असून शिल्पकला साकारणाऱ्या एका कलाकाराच्या भूमिकेत तो प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या भूमिकेबाबत तो खूप उत्सुक असून तो या भूमिकेची चांगलीच तयारी करत आहे. 
प्रत्येक कलाकाराला त्याच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतात. पण खूपच कमी कलाकारांना याची संधी मिळते. संजयला ही संधी मिळाल्यामुळे सध्या तो खूप आनंदित आहे. या चित्रपटाच्या इतर कलाकारांविषयी काहीही कळले नसले तरी संजयसोबत अनेक प्रसिद्ध कलाकार झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून वेळ असल्याने प्रेक्षकांना यासाठी वाट पाहावी लागणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेते अरुण नलावडे करत असून डॉ. शरयु पाझारे या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. 



 

Web Title: Sanjay Shejwal plays a sculptor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.