संजय नार्वेकरांच्या तीन पायांची शर्यत नाटकाचा दुबई दौरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 14:20 IST2017-01-22T08:27:14+5:302017-01-22T14:20:30+5:30
संजय नार्वेकर, शर्वरी लोहकरे आणि लोकेश गुप्ते या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असलेले तीन पायांची शर्यत हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस ...
(6).jpg)
संजय नार्वेकरांच्या तीन पायांची शर्यत नाटकाचा दुबई दौरा
ंजय नार्वेकर, शर्वरी लोहकरे आणि लोकेश गुप्ते या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असलेले तीन पायांची शर्यत हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. १० डिसेंबर रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. आणि अवघ्या दिड महिन्यातच प्रेक्षकांनी नाटकाला उचलुन धरले. २६ जानेवारी रोजी या नाटकाचा पंचवीसावा प्रयोग होणार असुन लवकरच हे नाटक दुबई दौºयासाठी रवाना होणार आहे. या नाटकाचे निर्माते संदेश भट यांनी लोकमत सीएनएक्सशी संवाद साधताना याविषयी सांगितले. ते म्हणाले, या नाटकाच्या निमित्ताने संजयला एका वेगळ््याच भूमिकेत बघायला प्रेक्षकांना आवडत आहे. तसेच शर्वरी आणि लोकेश यांची जोडी देखील हे नाटक गाजवित आहे. हे नाटक एक सस्पेंन्स र्थिलर असून ते प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आहे. या नाटकाची कथा हीच त्याचा खरा हीरो आहे. एका इंग्रजी नाटकावर आधारीत हे नाटक आहे. नोटाबंदीच्या काळात देखील नाट़्यरसिकांनी या नाटकावर भरभरून प्रेम केले आहे. लवकरच दुबईच्या मराठी नाट्यमहोत्सवामध्ये या नाटकाचा प्रयोग होणार असल्याने आम्हाला फारच आनंद होत आहे. त्यासाठी संपूर्ण टिमची जोरदार तयारी देखील सुरु आहे. १७ फेबु्रवारी रोजी दुबईत या नाटकाचा प्रयोग होईल असे भट यांनी सांगितले. आता दुबईच्या प्रेक्षकांच्या पसंतीस हे नाटक उतरते का हे तर आपल्याला लवकरच समजेल.