सलमान-विवेक एकाच मराठी चित्रपटात ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2016 17:43 IST2016-11-20T17:43:44+5:302016-11-20T17:43:44+5:30
रितेश देशमुख मराठी चित्रपट करणार आहे हे तर आम्ही तुम्हाला सांगितलेच होते. रितेशच्या या ...
.jpg)
सलमान-विवेक एकाच मराठी चित्रपटात ?
रितेश देशमुख मराठी चित्रपट करणार आहे हे तर आम्ही तुम्हाला सांगितलेच होते. रितेशच्या या चित्रपटात आपल्याला बॉलिवूड अभिनेता विवेक आॅबेरॉय पहिल्यांदाच मराठमोळ््या अंदाजात दिसणार आहे. परंतू आता रितेशच्या छत्रपती शिवाजी या मराठी चित्रपटात दबंग सलमान खान देखील काम करणार असल्याचे समजतेय. एवढेच नाही तर सलमानची या चित्रपटातील भूमिका देखील बºयापैकी लांबीची असल्याचे कळतेय. या चित्रपटाच्या निमित्ताने विवेक आणि सल्लुभाईचा आमना-सामना लवकरच होऊ शकतो. सलमान आणि विवेक यांच्यामधील वाद तर जगजाहीर आहे. विवेकने सलमानची अनेक वेळा माफी मागण्याचा देखील प्रयत्न केला होता. परंतू आता रितेशच्या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघे एकत्र काम करणार आहेत. सल्लुमियाँ लवकरच मराठी बोलताना देखील पाहायला मिळणार आहे. या आधी सलमानने रितेशच्याच लय भारी या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. छोटाच पण एकदम जबरदस्त डायलॉग सलमानने या चित्रपटात बोलला होता. सलमान उत्कृष्ठ मराठी बोलतो हे तर सर्वांनाच माहित आहे. आता रितेशच्या छत्रपती शिवाजी या चित्रपटात सलमानची काय भूमिका असणार हे अजुन तरी समजलेले नाही. पण सलमानची मराठी चित्रपट करण्याची इच्छा या चित्रपटामुळे पुर्ण होणार हे मात्र खरे. लय भारी या चित्रपटात देखील सलमानने रितेशच्या मागे लागुन पाहुण्या कलाकाराची भूमिका पटकावली असल्याचे समजतेय. बॉलिवूडमध्ये कोट्यावधी रुपयांचा गल्ला जमवणारा सलमान जर मराठी चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसला तर नक्कीच त्याच्या चाहत्यांना आनंद होईल. तर विवेक आणि सलमान खरंच एकत्र येणार का हे आपल्याला लवकरच समजेल.