सलमान खानच्या टायगर जिंदा है या चित्रपटामुळे अंकुश चौधरीच्या देवाला मिळत नाहीयेत चित्रपटगृह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 10:52 IST2017-12-19T05:22:47+5:302017-12-19T10:52:47+5:30

सलमान खानचा टायगर जिंदा है आणि अंकुश चौधरीचा देवा हा चित्रपट एकाच दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. टायगर जिंदा ...

Salman Khan's Tiger Jinda Hai is not available to Ankush Choudhary's Goddess | सलमान खानच्या टायगर जिंदा है या चित्रपटामुळे अंकुश चौधरीच्या देवाला मिळत नाहीयेत चित्रपटगृह

सलमान खानच्या टायगर जिंदा है या चित्रपटामुळे अंकुश चौधरीच्या देवाला मिळत नाहीयेत चित्रपटगृह

मान खानचा टायगर जिंदा है आणि अंकुश चौधरीचा देवा हा चित्रपट एकाच दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. टायगर जिंदा है या चित्रपटामुळे देवा या चित्रपटाला चित्रपटगृह मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय विनोद खोपकर यांनी चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना एक खरमरीत पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की,
आपण आपले चित्रपटगृह महाराष्ट्राच्या भूमीत चालवता याचा आपल्याला विसर पडला असावा म्हणून हे स्मरणपत्र. हे लिहिताना आम्ही आमच्या भावनांवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु त्या आपल्या एका कृतीमुळे अतिशय दुखावल्या गेल्या आहेत. दिनांक २२ डिसेंबर रोजी इनोव्हेटिव्ह फिल्म्सचा “देवा” हा मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्मात्याचा अथक प्रयत्न सुरू आहे. पण “चित्रपटगृह उपलब्ध नाही” असे ठोकळेबाज उत्तर त्याला प्रत्येक ठिकाणी मिळत आहे. कारण का? तर त्या दिवशी “टायगर जिंदा है” हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि त्या हिंदी निर्मात्याने आपल्या नावाचा, बळाचा धाक दाखवून सर्वच्या सर्व चित्रपटगृहांवर कब्जा केला आहे. पण मग बाकी निर्मात्यांनी काय करायचे? कुठे जायचे? ही अशी मोनॉपोली जर हिंदी निर्माते करणार असतील तर मराठी निर्मात्यांनी काय करायचे? दुसऱ्या कुठल्या गैरहिंदी राज्यात ही अशी दादागिरी सहन केली जाईल? एकदा दक्षिणेच्या कुठल्याही राज्यात असे धाडस करून बघा. पार्श्वभागावर लाथ मारून बाहेर काढतील, हाकलून देतील. मग या महाराष्ट्रातच मराठीची ही गळचेपी का होते आहे? याला जबादार असणाऱ्या अनेक घटकांपैकी तुम्ही एक आहात हे ध्यानात घ्या. येणाऱ्या सर्व चित्रपटांना संधी देणे हे तुमचे कर्तव्य आहे. तुमची चित्रपटगृहं हिंदीची बटीक नाहीत. सर्वभाषिक प्रेक्षकांना आणि विशेषतः मराठी प्रेक्षकांना अग्रक्रमाने सेवा देण्यासाठी तुम्ही आहात. तुम्ही म्हणाल की, हा आमचा प्रश्न आहे, आम्ही हवे ते करू. तर मग नीट ऐका. महाराष्ट्राची अस्मिता जपणे आणि मराठी चित्रपटांना त्यांचे हक्क मिळवून देणे हा आमचा प्रश्न आहे आणि तो सोडवण्यासाठी जे हवे ते आम्ही करू. आम्ही समंजस आहोत, सहनशील आहोत म्हणजे आम्ही दुर्बल आहोत असा गैरसमज तुम्ही करून घेतला असेल तर तो दुर्दैवी आहे. कदाचित साहेबांच्या (राज ठाकरे) भाषेत सांगितले तर तुम्हाला जास्त पटेल - Live and let live . स्वतः जागा आणि दुसऱ्याला जगू द्या. त्यात दोघांचेही हित आहे. आणि ह्या दोन्ही भाषा तुम्हाला समजत नसतील तर मग आम्हाला आमच्या “खास” भाषेत तुम्हाला समजावून सांगायला लागेल. तेव्हा तुटेल एवढे ताणू नका.
आमची नम्र विनंती आहे की २२ डिसेेंबरला इनोव्हेटिव्ह फिल्म्सच्या “देवा” या मराठी चित्रपटाला आपल्या चित्रपटगृहात प्राईम टाईममध्ये खेळ द्या.

tiger zinda hai


Also Read : देवा सिनेमाचे जराशी जराशी हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस

Web Title: Salman Khan's Tiger Jinda Hai is not available to Ankush Choudhary's Goddess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.