स्मिता तांबेच्या संकल्पनेतील व्हिडीओची सलमान खानने घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 14:18 IST2017-01-23T08:48:03+5:302017-01-23T14:18:03+5:30

सफाई कामगारांची मेहनत मुंबईकरांच्या नागरिकांपुढे यावी यासाठी अभिनेत्री स्मिता तांबे हिच्या संकल्पनेतून नुकताच एक व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.

Salman Khan took control of the video of Smita Tambe's concept | स्मिता तांबेच्या संकल्पनेतील व्हिडीओची सलमान खानने घेतली दखल

स्मिता तांबेच्या संकल्पनेतील व्हिडीओची सलमान खानने घेतली दखल

ंबईनगरी ही प्रत्येक व्यक्तीची स्वप्नांची नगरी असते. या नगरीत येण्यासाठी प्रत्येक व्यक्ती हा आतुर झालेला असतो. या शहराची महतीच काही निराळी आहे. आता अशा या स्वप्नांच्या नगरीला सध्या अस्वच्छतेने वेढले आहे. या शहरात ठिकठिकाणी कचरा, वाहणारे गटार मोठया प्रमाणात पाहायला मिळतात. मात्र आता हे शहर स्वच्छ राहावे यासाठी सफाई कामगार दिवसरात्र मेहनत करत असताना पाहायला मिळत आहे. ते नागिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी कशा पध्दतीने शहराची स्वच्छता ठेवतात.  या सफाई कामगारांची मेहनत मुंबईकरांच्या नागरिकांपुढे यावी यासाठी अभिनेत्री स्मिता तांबे हिच्या संकल्पनेतून नुकताच एक व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.


    
         या व्हिडीओला सोशलमीडियावरून प्रचंड पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. एवढेच नाही तर या व्हिडीओची दखल बॉलिवुडचा तगडा कलाकार सलमान खान यानेदेखील घेतली आहे. सलमानने आपल्या आॅफिशियल ट्विटर हँडलवरुन हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसेच आपल्या पोस्टच्या माध्यमातून त्याने या सफाई कामगारांसाठी थॅक्स तो बनता है म्हणत व्हिडीओच्या संकल्पनेचे कौतुक केले आहे. अभिनेत्री स्मिता तांबे हिच्या संकल्पनेतून बंकिमचंद्र चॅटर्जी लिखित वन्दे मातरम् गीत वापरुन सफाई कामगारांचं जीणं समोर आणण्याचा प्रयत्न या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे.

        रिंगिंग रेन फिल्म्सची निर्मिती असेलेला हा व्हिडीओ धीरेंद्र आर. के. द्विवेदी यांनी दिग्दर्शित केला आहे. मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी अपार मेहनत घेणाºया कामगारांना सलाम करणं, हा एकमेव उद्देश या व्हिडीओमागे आहे. आता हा व्हिडीओ सोशलमीडियावर शंभर टक्के यशस्वी झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच सलमान खान या व्हिडीओची दखल घेतल्याविषयी अभिनेत्री स्मिता तांबेनेदेखील सोशलमीडियावर दबंग खानचे आभार मानले. 

{{{{twitter_post_id####}}}}

Web Title: Salman Khan took control of the video of Smita Tambe's concept

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.