सलमान खानने केले या मराठी चित्रपटाचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2017 13:43 IST2017-02-09T08:13:07+5:302017-02-09T13:43:07+5:30

 बॉलिवुडचा तगडा कलाकार सलमान खान याने पुन्हा महेश मांजरेकर यांचे सोशलमीडियावर कौतुक केले आहे. प्रेक्षकांच्या या लाडक्या कलाकाराने यंदा ...

Salman Khan praised the Marathi film | सलमान खानने केले या मराठी चित्रपटाचे कौतुक

सलमान खानने केले या मराठी चित्रपटाचे कौतुक

 
ॉलिवुडचा तगडा कलाकार सलमान खान याने पुन्हा महेश मांजरेकर यांचे सोशलमीडियावर कौतुक केले आहे. प्रेक्षकांच्या या लाडक्या कलाकाराने यंदा मराठी चित्रपटसृष्टीच्या या दिग्गज दिग्दर्शकांच्या एफयू  चित्रपटाविषयी कौतुक केले आहे. त्याने या चित्रपटातील एफयू या चित्रपटातील गाण्याविषयी ट्वििट केले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना  ध्यानीमनी या चित्रपटाबरोबरच एफयू या चित्रपटाविषयीदेखील उत्सुकता निर्माण झाली आहे. 

      यापूर्वीदेखील महेश मांजरेकर यांच्या ध्यानीमनी या चित्रपटाला बॉलिवुडचे बिग बी आणि सलमान खान यांनी सोशलमीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. हा चित्रपट प्रेक्षकांना १० फ्रेबुवारीला प्रदर्शित होणार आहे. यानंतर लगेच त्यांच्या एफयू हा चित्रपटदेखील प्रदर्शनास सज्ज झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या चित्रपटाच्या  टायटल सॉन्गचा नुकताच व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे. या टायटल सॉन्गवर प्रेक्षकांचा लाडका कलाकार आकाश ठोसर थिरकताना दिसत आहे. या गाण्याला फार कमी कालावधीत प्रचंड पसंती मिळाली असल्याचे पाहायला मिळत आहे. 
   
         एफयू या चित्रपटाकडे सगळेच लक्ष लावून बसले आहेत. तसेच कॉलेज जीवनावर आधारित चित्रपट असल्याने खास तर या चित्रपटाची चर्चा तरूणांमध्ये अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर या चित्रपटात सैराटचा हिरो आकाश ठोसर आहे. त्यामुळे त्याची पुन्हा झलक पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्साही आहे. आकाशसोबतच या चित्रपटात सत्या मांजरेकर, संस्कृती बालगुडे, मधुरा देशपांडे, मयुरेश पेम, माधव देवचक्के असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक तरूण कलाकार दिसणार आहे. 

{{{{twitter_post_id####}}}}

Web Title: Salman Khan praised the Marathi film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.