r /> खंडोबाची भुमिका साकारुन अवघ्या महाराष्ट्रात घराघरात पोचलेला अभिनेता म्हणजे देवदत्त नागे. आता देवदत्तची झोप सलमानने उडवली असे ऐकल्यावर त्याच्या चाहत्यांना नक्कीच उत्सुकता असेल की असे काय झाले की सलमानने देवदत्तची झोप उडवली आहे. तर त्याचे झाले असे , गोरेगाव फिल्मसिटी मध्ये सलमानच्या सुलतान या चित्रपटाचा सेट लागला होता. अन तिथेच शेजारी देवदत्तच्या मालिकेचे चित्रीकरण सुरु होते मग देवदत्तने सलमानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली अन तो थेट पोहचला आपल्या दबंग खानला भेटण्यासाठी सुलतानच्या सेटवर. या भेटीविषयी देवदेत्तने सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टी भरभरुन सांगितल्या. तो म्हणाला, मी सलमानचा खुप मोठा चाहता आहे. जेव्हा मला समजले सुलतानचा सेट शेजारी लागला आहे तेव्हाच मी सलमानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली पण काही कारणास्तव मला भेटता आले नाही. मग एके दिवशी सलमाननेच मला सेटवर भेटण्यासाठी बोलवले. त्याने माझे भरभरुन कौतुक केले, माझ्या अभिनयाविषयी, फिजिक्सविषयी तो माझ्याशी आपलेपणाने बोलला. माझ्यासोबत त्याने फोटोज देखील काढले. सलमान इज अ रिअल ह्युमन बिंग. तो खुप सुंदर दिसतो. त्याला जवळून पाहता आले त्याचे मसल्स, बायसेप्स अन बॉडी पाहुन मी खरच वेडा झालो. मी २५ वर्षाच्या मुलासामेर उभा आहे असेच मला वाटले. मी त्यांना तेव्हा सांगितले की आज मी तुम्हाला भेटला आहे तर रात्री खरच झोपु शकणार नाही. मी त्यांना सलमान सरच म्हणीन एवढ त्या माणसान माझ्यावर गारुड केल आहे. त्यांच्या माणुसकीच्या चर्चा ऐकल्या होता पण मी जेवाह समोरुन पाहिल तेवाह समजल खरच तो एकदम डाऊन टु अर्थ माणुस आहे. मी जेव्हा बॉडीबिल्डींग सुरु केली तेव्हा माझ्या रुममध्ये मी सलमानचे फोटो लावले होते. अन आज मी माझ्या आयडल पर्सन सोबत फोटो काढला त्याला भेटलो मला खरच खुप बरे वाटले. देवदत्तवर चढलेला हा सलमानचा हँगोवर पाहता सलमानने त्याची नक्कीच झोप उडवली हे मात्र खरे.