​सखी म्हणतेय.. मोदीनी नोट बदलले पण आम्ही कपडे बदलतो ते पण फास्ट फास्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 15:34 IST2016-12-24T15:25:57+5:302016-12-24T15:34:37+5:30

सखी गोखले दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेनंतर घराघरात पोहचली. या मालिकेने निरोप घेतल्यावर सखी एका चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त झाली. ...

Sakhi says .. Modi changed note but we changed clothes but fast fast | ​सखी म्हणतेय.. मोदीनी नोट बदलले पण आम्ही कपडे बदलतो ते पण फास्ट फास्ट

​सखी म्हणतेय.. मोदीनी नोट बदलले पण आम्ही कपडे बदलतो ते पण फास्ट फास्ट

ी गोखले दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेनंतर घराघरात पोहचली. या मालिकेने निरोप घेतल्यावर सखी एका चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त झाली. लवकरच सखी आपल्याला सिदधार्थ चांदेकर सोबत चित्रपटात दिसणार आहे. परंतू सखी सध्या अमर फोटो स्टुडिओ हे नाटक करीत आहे. या नाटकाचे संपूर्ण महाराष्ट्रभर आता दौरे सुरु आहेत. तर नुकतेच सखीने पंतप्रधान नरेंद्र मोदि यांनी नोटा बदलल्या पण आम्ही तर आमचे कपडे बदलते आणि ते पण एकदम फास्ट फास्ट... असे गमतीत म्हंटले आहे. सखीने सोशल साईट्सवर अमेय सोबतचा तिचा एक सेल्फी शेअर करीत या गोष्टी सांगितल्या आहेत. सखी सांगते, मोदी चेंज करन्सी... बादशाह चेंज हम्मा हम्मा... आॅल वी चेंज इज क्लोथ्स, व्हेरी व्हेरी फास्ट. असे म्हणुन सखी एवढ्यावरच थांबलेली नाही तर ती पुढे म्हणतेय, आमचे स्कील बघायला या.. ओरिजनल आहे. अमर फोटो स्टुडिओ या नाटकाची सध्या सगळीकडेच खुप चर्चा आहे. प्रेक्षकांना हे नाटक आवडत देखील आहे. अमेय वाघ, सखी गोखले, सुव्रत जोशी आणि पुजा ठोंबरे यांच्या प्रमुख भूमिका या नाटकात आहेत. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेनंतर पुन्हा हे चौघजण या नाटकाच्या निमित्ताने रसिकांना एकत्र पाहायला मिळत आहेत. सध्या नोटाबंदिमुळे नाटकावर परिणाम झाला होता. परंतू असे असताना देखील नाट्यरसिकांनी मात्र या नाटकाला भरभरुन प्रतिसाद दिल्याचे या नाटकाचे निर्माते सुनील बर्वे यांनी लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले होते. आता पुन्हा याच नाटकाच्या बॅकस्टेजला सखी आणि अमेय धमाल, मजा आणि मस्ती करताना दिसत आहेत. सखीने तर तिच्या सर्व चाहत्यांना या नाटकाच्या प्रयोगला येण्याचे सोशल साईट्सवर निमंत्रणच दिले आहे. मग कोण कोण जातय या नाटकाला?

Web Title: Sakhi says .. Modi changed note but we changed clothes but fast fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.