'पिझ्झा,बर्गर नको त्यापेक्षा २० रुपयांची भेळ द्या'; आजही आर्चीने जपलाय तिचा साधेपणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 03:54 PM2023-07-13T15:54:56+5:302023-07-13T15:56:47+5:30

Rinku rajguru: आर्ची म्हणून लोकप्रिय झालेल्या रिंकूला मध्यंतरी तिच्या वाढलेल्या वजनावरुन अनेकांनी ट्रोल केलं होतं.

sairat fame rinku rajguru does not like eating pizza and burger | 'पिझ्झा,बर्गर नको त्यापेक्षा २० रुपयांची भेळ द्या'; आजही आर्चीने जपलाय तिचा साधेपणा

'पिझ्झा,बर्गर नको त्यापेक्षा २० रुपयांची भेळ द्या'; आजही आर्चीने जपलाय तिचा साधेपणा

googlenewsNext

संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावत आपल्या प्रेमात पाडणारा सिनेमा म्हणजे 'सैराट' (sairat). नागराज मंजुळे यांच्या 'सैराट'ने मराठी कलाविश्वात तुफान लोकप्रियता मिळवली. इतकंच नाही तर या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी रिंकू राजगुरू (rinku rajguru) आणि आकाश ठोसर (aakash thosar) ही जोडी रातोरात सुपरस्टार झाली. रिंकूला तर आजही लोक आर्ची म्हणूनच ओळखतात. विशेष म्हणजे अफाट लोकप्रियता मिळवल्यानंतरही रिंकूने तिचा साधेपणा जपला आहे. सध्या सोशल मीडियावर तिची एक मुलाखत चर्चेत येत आहे.

आर्ची म्हणून लोकप्रिय झालेल्या रिंकूला मध्यंतरी तिच्या वाढलेल्या वजनावरुन अनेकांनी ट्रोल केलं होतं. परंतु, योग्य व्यायाम, आहार घेत तिने तिचा फिटनेस जपला. यामध्येच रिंकूने एका मुलाखतीमध्ये तिला कोणते पदार्थ सगळ्यात जास्त आवडतात हे सांगितलं.

रिंकूच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. परंतु, तिच्या खाण्यापिण्याची आवडनिवड पूर्वीसारखीच आहे. त्यामुळेच या मुलाखतीमध्ये तिने पिझ्झा, बर्गरपेक्षा मी भेळ खाणं पसंत करेन असं सांगितलं.

"माझे मित्र-मैत्रिणी पिझ्झा, बर्गर खातात. पण, मला ते अजिबात आवडत नाही. मला तो प्रकारच बिल्कूल आवडत नाही. हा मी फारफार तर पिझ्झाचा बेस खाऊ शकते. पण, पिझ्झावरचं टॉपिंग अजिबात नाही.  त्यापेक्षा तुम्ही मला २० रुपयांची भेळ आणून द्या. मी ती आवडीने खाईन, असं रिंकू म्हणाली. दरम्यान, रिंकूने सैराटनंतर अनेक सिनेमा, वेबसीरिजमध्ये काम केलं. कागर, आठवा रंग प्रेमाचा, झुंड, मेकअप यांसारख्या सिनेमात ती झळकली.
 

Web Title: sairat fame rinku rajguru does not like eating pizza and burger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.