डोंबिवलीच्या शोभायात्रेची आकाश ठोसरने वाढवली शान; ढोल वाजवत जिंकली चाहत्यांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 18:23 IST2023-03-22T18:22:17+5:302023-03-22T18:23:17+5:30

Aakash thosar: सध्या सोशल मीडियावर आकाशचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आकाश ढोल वाजवताना दिसत आहे.

sairat fame marathi actor aakash thosar played dram | डोंबिवलीच्या शोभायात्रेची आकाश ठोसरने वाढवली शान; ढोल वाजवत जिंकली चाहत्यांची मनं

डोंबिवलीच्या शोभायात्रेची आकाश ठोसरने वाढवली शान; ढोल वाजवत जिंकली चाहत्यांची मनं

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आकाश ठोसर (aakash thosar) सध्या त्याच्या 'घर बंदूक बिरयानी' (ghar banduk biryani) या चित्रपटामुळे चर्चेत येत आहे. सैराटमधून फिल्मी करिअरला सुरुवात करणारा आकाश आज मराठीतला नावाजलेला अभिनेता म्हणून ओळखला जातो. आकाशचा घर बंदूक बिरयानी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या आकाश आणि अभिनेत्री सायली पाटील या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. यामध्येच या जोडीने गुढी पाडव्याच्या शोभायात्रेत हजेरी लावली. इतकंच नाही तर आकाशने वाजवलेल्या ढोलावर सायलीने ताल धरला.

सध्या सोशल मीडियावर आकाशचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आकाश ढोल वाजवताना दिसत आहे. हा व्हिडीओ आकाशने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

आकाश आणि सायली या जोडीने सिनेमाच्या प्रमोशनसाठी डोंबिवलीमध्ये हजेरी लावली होती. यावेळी निघालेल्या शोभायात्रेत या दोघांनीही सहभाग घेतला. इतकंच नाही तर आकाशने ढोलही वाजला आणि त्यानंतर दोघांनी लेझीमही खेळले. त्यामुळे त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, नागराज मंजुळे यांच्या घर बंदूक बिरयानी या सिनेमात आकाश ठोसर आणि सायली पाटील मुख्य भूमिकेत झळकले आहेत. तर, अभिनेत्री दिप्ती देवीदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
 

Web Title: sairat fame marathi actor aakash thosar played dram