"रिंकूला खूप सिनेमे करायची गरज नाही, पण मला...", 'सैराट' फेम तान्हाजीचं विधान चर्चेत, स्पष्टच म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 17:14 IST2026-02-09T17:14:04+5:302026-02-09T17:14:41+5:30
सैराटनंतरही तान्हाजी अनेक सिनेमांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारताना दिसला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तान्हाजीने मुख्य भूमिका आणि सहाय्यक भूमिका साकारणारे कलाकार याबद्दल भाष्य केलं.

"रिंकूला खूप सिनेमे करायची गरज नाही, पण मला...", 'सैराट' फेम तान्हाजीचं विधान चर्चेत, स्पष्टच म्हणाला...
नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमातून अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर तर रातोरात स्टार झाले. सिनेमात परश्याच्या मित्राची भूमिका साकारून अभिनेता तान्हाजी गालगुंडे घराघरात पोहोचला. सैराटनंतरही तान्हाजी अनेक सिनेमांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारताना दिसला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तान्हाजीने मुख्य भूमिका आणि सहाय्यक भूमिका साकारणारे कलाकार याबद्दल भाष्य केलं.
तान्हाजीने नुकतीच सकाळला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, "सैराटनंतर रिंकूमध्ये झालेला बदल हा कौतुक करण्यासारखाच आहे. तिने स्वत:ला खूप छान घडवलं आहे. पण नाही म्हटलं तरी, मुख्य भूमिका साकारणारे कलाकार आणि त्यांची किंमत वेगळी असते आणि सहाय्यक, छोट्या भूमिका करणाऱ्या कलाकारांची व्हॅल्यूव्ह वेगळी असते. त्यामुळे रिंकूचा एक सिनेमा आणि माझे १०,२०,२५, ३० सिनेमे...असं त्याचं गणित आहे. त्यामुळे तिला खूप सिनेमे करायची गरज नाहीये. तिने एक चांगला सिनेमा जरी केला तरी चालणार आहे. पण मला मात्र काहीका असेना छोटे मोठे सिनेमे करत राहणं भाग आहे".
सैराटनंतर मित्रांकडून आर्थिक फसवणूक झाल्याचा खुलासाही तान्हाजीने या मुलाखतीत केला. तान्हाजीने सैराटनंतर भिरकिट, फ्रि हिट दणका, एकदम कडक, माझा अगडबम, मुसंडी, नवरदेव बीएसी अॅग्रिकल्चर, घर बंदुक बिरयानी या सिनेमांमध्ये काम केलं. सिनेमांमध्ये काम करतानाच तान्हाजी गावी शेतीदेखील करतो.