प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या प्रोजेक्टमध्ये सई ताम्हणकरची वर्णी, या तामिळ अभिनेत्यासोबत झळकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 14:21 IST2021-07-30T14:16:40+5:302021-07-30T14:21:12+5:30
सई ताम्हणकरने फोटो शेअर करताना तामिळमध्ये कॅप्शन दिलंय. त्यामुळे कॅप्शननेच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘नवरसा’ या तमिळ सीरिजचे नाव आहे.

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या प्रोजेक्टमध्ये सई ताम्हणकरची वर्णी, या तामिळ अभिनेत्यासोबत झळकणार
रसिकांच्या काळजावर अधिराज्य मिळवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.सध्यासई ताम्हणकर हिंदी सिनेमा 'मिमी'मुळे चर्चेत आहे. हिंदीसोबतच आता सई तमिळमध्येही झळकणार आहे. याची माहिती खुद्द सईनेच सोशल मीडियावर दिली आहे.
विशेष म्हणजे सई ताम्हणकर तामिळ अभिनेता विजय सेतुपथीसोबत झळकणार आहे. सईने फोटो शेअर करताना तामिळमध्ये कॅप्शन दिलंय. त्यामुळे कॅप्शननेच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘नवरसा’ या तमिळ सीरिजचे नाव आहे.
नुकताच या सिरीजचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरलाही रसिकांची प्रचंड पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे ट्रेलर रिलीज होताच ‘नवरसा’ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. ट्रेलरपाहून रसिकांमध्येही प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘नवरसा’च्या ट्रेलरमध्ये सईची छोटीशी झलक पहायला मिळत आहे.
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म रसिकांनाही ही सिरीज पाहाता येणार आहे. ‘नवरसा’ या सीरिजचे दिग्दर्शन आणि निर्मिती प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांनी केले आहे. या वेब सीरीजमध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार झळकणार आहेत. विशेष म्हणजे या सिरीजमधून मिळणारी सगळी रक्कमही मनोरंजन क्षेत्रातील गरजू तंत्रज्ञ मंडळीना मदत म्हणून दिली जाणार आहे.