सई ताम्हणकर आणि क्रिती सनॉनची खास दिवाळी, 'परमसुंदरी'चं रियुनियन पाहून चाहते खुश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 17:22 IST2025-10-24T17:22:29+5:302025-10-24T17:22:56+5:30
सईच्या दिवाळी सेलिब्रेशनची झलक पाहून चाहते खुश झाले आहेत.

सई ताम्हणकर आणि क्रिती सनॉनची खास दिवाळी, 'परमसुंदरी'चं रियुनियन पाहून चाहते खुश
दिवाळीच्या उत्साहात बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पार्ट्या आणि खास फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. यातच मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने दिवाळीतील काही फोटो शेअर केले आहेत. सई ताम्हणकरने यंदाही तिच्या मुंबईतील 'द इलेव्हेंथ प्लेस' घरात 'दिवाळी पहाट' कार्यक्रमाचे आयोजन केलं. सईच्या दिवाळी सेलिब्रेशनची झलक पाहून चाहते खुश झाले आहेत.
सई ताम्हणकर हिने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर दिवाळी सेलिब्रेशनमधील काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिने अभिनेत्री क्रिती सनॉन सोबतचा एक सेल्फी शेअर केला आहे, ज्यामुळे चाहत्यांना आनंद झाला आहे. पोस्टमध्ये सई आणि क्रिती दोघीही अत्यंत आनंदी आणि हसऱ्या चेहऱ्याने पोज देताना दिसत आहेत. या सेल्फीमध्ये दोघींमध्ये असलेली मैत्री आणि जिव्हाळा स्पष्टपणे दिसून येतो. सईने 'diwali 2025' या कॅप्शनसह ही पोस्ट शेअर केली आहे.
'परमसुंदरी'चं रियुनियन पाहून चाहते खूश झालेत. या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. क्रिती आणि सई यांच्यातील संबंध हे 'मिमी' या चित्रपटामुळे आहेत, ज्यामध्ये त्यांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटात सईची भूमिका 'शमा' या क्रितीच्या मैत्रीणीची होती. क्रितीला 'मिमी' चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्या दोघी अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसल्या आहेत.