ललित प्रभाकरच्या वाढदिवशी सई ताम्हणकरची खास पोस्ट, शेअर केला क्यूट व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 16:16 IST2023-09-12T16:12:24+5:302023-09-12T16:16:01+5:30
अभिनेत्री सई ताम्हणकरने ललितसाठी खास पोस्ट केली. या पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Sai Tamhankar
मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय ललित प्रभाकरचा आज ३६ वा वाढदिवस आहे. मालिका, चित्रपट, वेब सिरिज अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर ललितवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अभिनेत्री सई ताम्हणकरने ललितसाठी खास पोस्ट केली. या पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सई ताम्हणकरने दोघांचा एक फोटो आणि एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पोस्टमध्ये तिनं लिहलं की, "शेफला वाढदिवसाच्या शुभेच्छा. जुग जुग जियो'. सईने शेअर केलेल्या फोटोत ललित हा शेफच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. तर व्हिडीओत ललित सईचा मेकअप करताना दिसत आहे. दोघांच्या पोस्टवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलायं.
सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर हे मराठीतील आघाडीचे दोन कलाकार आहेत. दोघांनी अनेक प्रोजेक्ट्स मध्ये एकत्र काम केलंय. ही जोडी प्रेक्षकांच्या आवडीची जोडी आहे. त्यांनी याआधी पेटपुराण वेबसिरीज एकत्र केली होती. तसेच दोघे जण ‘मिडीयम स्पायसी’ चित्रपटात एकत्र दिसले होते.
ललितचा जन्म १२ सप्टेंबर १९८७ रोजी कल्याणला झाला होता. ललित हा एक गुणी अभिनेता आहे रंगभूमी, छोटा पडदा आणि रुपेरी पडद्यावर त्याने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. ललित हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. ललित प्रभाकरनं मराठी मालिकेतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. याशिवाय हंपी, आनंदी गोपाळ, राजवाडे अँड सन्स आणि नुकताच प्रदर्शित झालेला झोम्बिवली या सिनेमातील त्याच्या भूमिका प्रचंड गाजल्या.