सई ताम्हणकर दिसणार सोलो या दाक्षिणात्य चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 16:55 IST2017-07-29T11:25:36+5:302017-07-29T16:55:36+5:30
सई ताम्हणकरने दुनियादारी, बालक पालक, नो एंट्री पुढे धोका आहे यांसारख्या चित्रपटांमधून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. आज मराठी ...

सई ताम्हणकर दिसणार सोलो या दाक्षिणात्य चित्रपटात
स ताम्हणकरने दुनियादारी, बालक पालक, नो एंट्री पुढे धोका आहे यांसारख्या चित्रपटांमधून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. आज मराठी इंडस्ट्रीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. तिने मराठी चित्रपटांसोबतच गजनी, हंटर यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. हंटर या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये मिळालेल्या यशानंतर ती आता दाक्षिणात्य इंडस्ट्रीकडे वळली आहे. लवकरच ती सोलो या दाक्षिणात्य चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट मल्याळम आणि तामिळ या दोन्ही भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
सोलो हा रोमँटिक थ्रिलर चित्रपट असून या चित्रपटाचे दिग्दर्शन बिजोय नामदार यांनी केले आहे तर डलकर सलमानची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. त्याचसोबत डिनो मोरिया, नेहा शर्मा हे बॉलिवूडमधील कलाकार देखील या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाचे काही चित्रीकरण कोचिन तर काही चित्रीकरण मुंबईत आणि लोणावळ्यात झाले आहे. या चित्रपटात सईची भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे.
सोलो या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट करून सईनेच तिच्या फॅन्सना ही बातमी दिली आहे. सोलो या चित्रपटात मी महत्त्वाची भूमिका साकारत असून या चित्रपटाचा टीझर लवकरच तुमच्या भेटीस येणार असल्याचे तिने म्हटले आहे.
सईने तिच्या चित्रपटाबाबत अथवा तिच्या भूमिकेबाबत तिच्या फॅन्सना काहीही न सांगणेच पसंत केले आहे. तिच्या मराठी चित्रपटांप्रमाणेच तिचा हा दाक्षिणात्य चित्रपट देखील प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करेल अशी तिच्या फॅन्सना खात्री आहे.
Also Read : सई ताम्हणकर पडली 'या' अभिनेत्याच्या प्रेमात