​ सई ताम्हणकर झाली सिमरन....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 21:58 IST2016-02-20T04:54:07+5:302016-02-19T21:58:10+5:30

          दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटाने तरुणांना वेड लावले होते. या सिनेमाचा हॅगओवर आजच्या ...

Sai Tamhankar went to Simran .... | ​ सई ताम्हणकर झाली सिमरन....

​ सई ताम्हणकर झाली सिमरन....


/>          दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटाने तरुणांना वेड लावले होते. या सिनेमाचा हॅगओवर आजच्या कॉलेजियन्समधेही पहायला मिळतो. राज- आणि सिमरन ही जोडी आपल्याला मोठ्या पडद्यावर जगता यावी अशी स्वप्न तर सर्रास सगळ््याच कलाकारांची असतील असे म्हणायला वावगे ठरणार नाही. काजोल आणि शाहरुखच्या डिडिएलजे मधील डायलॉगने तर धुम केली होती.  

        सई ताम्हणकर डिडिएलजे मधील सिमरन झाली आहे हे ऐकुन आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. जसे प्रत्येकालाच आपण सिमरन असल्याचे वाटते तशीच हौस सईने देखील पुर्ण करुन घेतली आहे. सई कोणत्या चित्रपटामध्ये सिमरन झाली नाही तर ती एका डबस्मॅशमध्ये सिमरन बनली आहे. अभिनेता चिराग पाटील याच्या सोबत तिने बडे बडे शहरोंमे ऐसी छोटी, छोटी बाते होती रेहेती है सेनेरिटा.... हा फेमस डायलॉगचा डबस्मॅश केला आहे. तिने तीची ही इच्छा १० सेकंदाच्या डबस्मॅशमधअये जरी पुर्ण केली असली तरी मोठ्या पडद्यावर तिला लवकरच सिमरन साकारायला मिळेल अशी आशा करायला काहीच हरकत नाही.

    

Web Title: Sai Tamhankar went to Simran ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.