​सई ताम्हणकरचे फेसबुकवर एक दक्षलक्ष फोलोव्हर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 17:52 IST2017-03-31T12:22:54+5:302017-03-31T17:52:54+5:30

दुनियादारी, बालकपालक, वजनदार यांसारख्या चित्रपटांच्या यशानंतर सई ताम्हणकर मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नायिका बनली आहे. तिने गेल्या काही वर्षांत ...

Sai Tamhankar is a standalone follower on Facebook | ​सई ताम्हणकरचे फेसबुकवर एक दक्षलक्ष फोलोव्हर्स

​सई ताम्हणकरचे फेसबुकवर एक दक्षलक्ष फोलोव्हर्स

नियादारी, बालकपालक, वजनदार यांसारख्या चित्रपटांच्या यशानंतर सई ताम्हणकर मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नायिका बनली आहे. तिने गेल्या काही वर्षांत अनेक हिट चित्रपट दिले असून एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. तिच्या फॅन्सची संख्या करोडोमध्ये असून तिचे फॅन्स नेहमीच तिला भेटण्याची, तिच्यासोबत गप्पा मारण्याची इच्छा व्यक्त करत असतात. सईदेखील सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तिच्या फॅन्सच्या नेहमीच संपर्कात राहात असते. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर ती नेहमीच अॅक्टिव्ह असते. सगळ्याच सोशल नेटवर्किंग साइटवर तिला अनेक फोलोव्हर्स आहेत. सई तिच्या आगामी प्रोजेक्टविषयी माहिती या सोशल नेटवर्किंगवरून नेहमीच देत असते. तसेच तिचे फोटो तिच्या चाहत्यांसाठी पोस्ट करत असते. तसेच चित्रीकरणादरम्यानच्या गप्पागोष्टी त्यांच्यासोबत शेअर करत असते. तसेच ती कुठे फिरायला गेली तर तिथले फोटो आवर्जून सोशल नेटवर्किंगवर टाकते.
फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर तर तिचे स्वतःचे अकाऊंट असण्यासोबतच तिचे एक पेजदेखील आहे. तिच्या अकाऊंटवर अनेक हजार फ्रेंड्स असण्यासोबतच 76 हजारहून अधिक लोक तिथा फॉलो करत आहेत. तसेच तिच्या फेसबुक पेजवरही अनेक फॉलोव्हर्स आहेत. तिचे फेसबुक पेज आणि अकाऊंट हे दोन्ही फेसबुककडून व्हेरिफाइटदेखील करण्यात आले आहेत. आता फेसबुक पेजवर तिला एक दक्षलक्षहून अधिक लोक फॉलो करत आहेत. तिच्या फेसबुक फोलोव्हर्सची संख्या एक दशलक्षहून अधिक झाल्याबद्दल तिने तिच्या फॅन्सचे आभार मानले आहेत. एक दशलक्षाहून अधिक लोकांचे मला प्रेम मिळाले असून यापेक्षाही अधिक लोकांचे भविष्यात प्रेम मिळणार आहे असे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे. 



Web Title: Sai Tamhankar is a standalone follower on Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.