सई ताम्हणकरने शेअर केलं नवं फोटोशूट, कॅप्शनने वेधलं सगळ्यांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 15:39 IST2021-03-10T15:32:54+5:302021-03-10T15:39:23+5:30
अभिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत सई ताम्हणकर तितकीच सजग आहे.

सई ताम्हणकरने शेअर केलं नवं फोटोशूट, कॅप्शनने वेधलं सगळ्यांचं लक्ष
अभिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत सई ताम्हणकर तितकीच सजग आहे. ट्रेंडपेक्षा स्वतः एखाद्या स्टाईलमध्ये किती कम्फर्टेबल आहोत याला अधिक प्राधान्य देते. हटके स्टाईल आणि फॅशनमधील स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून सई ताम्हणकर नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सईने नुकतेच ब्ली जॅकेटमधले फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.फोटोत पोज देताना सईच्या चेहऱ्यावर अगदी शांत भाव दिसत आहे. Calming असं कॅप्शन तिने या फोटोसोबत दिले आहे.
सई ताम्हणकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच कलरफुल या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात सई मीराच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. ही एक लव्हस्टोरी आहे. तसेच सई ताम्हणकर हिंदी इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'मिमी' या हिंदी चित्रपटात ती झळकणार आहे. यात तिच्यासोबत क्रिती सनॉन मुख्य भूमिकेत आहे.