बोल्डचे सईचे नववारीतही खुललं सोज्वळ सौंदर्य, फोटो पाहून पुन्हा पडाल तिच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 11:01 IST2019-08-23T10:55:13+5:302019-08-23T11:01:07+5:30
सईने साडीमध्ये फोटोशूट करुन तिच्या फॅन्सना घायाळ केले आहे

बोल्डचे सईचे नववारीतही खुललं सोज्वळ सौंदर्य, फोटो पाहून पुन्हा पडाल तिच्या प्रेमात
आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई ताम्हणकर मराठी सिनेइंडस्ट्रीत ओळखली जाते. मात्र यावेळी सईने साडीमध्ये फोटोशूट करुन तिच्या फॅन्सना घायाळ केले आहे. सई सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे, ती कुठे फिरतेय ही ती तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असते.
सईने नुकताच फेसबुकवर फोटो शेअर केले आहेत. हे फोटोशूट सईने साडीमध्ये केले आहे. या फोटोत ती खूप सुंदर व सोज्वळ दिसत आहे. सईचे हे फोटोशूट पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडले. साडी सईच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. तिच्या या फोटोला खूप पसंती मिळते आहे.
सईच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच वैभव तत्त्वादीसोबत 'पाँडेचेरी' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात सईसह वैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी झळकणार आहेत.
या सिनेमाचे बरेचसे शूटिंग पाँडेचेरीमध्ये करण्यात आले आहे. सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांनी या चित्रपटाची कथा लिहली असून हा एक कौटुंबिक विषयावर आधारित चित्रपट आहे. सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
तिने दुनियादारी, बालक पालक, वजनदार यांसारख्या मराठी चित्रपटात तर हंटर, गजनी यांसारख्या हिंदी चित्रपटातही खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने हिंदीमध्ये साकारलेल्या भूमिकांचे देखील तितकेच कौतुक झाले आहे. सईच्या अभिनयासाठी तिला आजवर अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. सईचा आगामी चित्रपट कधी भेटीस येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात.