सई ताम्हणकरला लागली लॉटरी, कशी, कधी, कुठे ते वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 14:09 IST2019-11-01T14:07:07+5:302019-11-01T14:09:23+5:30
सईचे फॅन्स ही बातमी वाचून नक्कीच खुश होतील.

सई ताम्हणकरला लागली लॉटरी, कशी, कधी, कुठे ते वाचा!
सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने दुनियादारी, बालक पालक, वजनदार यांसारख्या मराठी चित्रपटात तर हंटर, गजनी यांसारख्या हिंदी चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार सई पुन्हा एकदा हिंदी सिनेमात दिसणार आहे.
लक्ष्मण उतेकर यांच्या मिमी सिनेमात सईची वर्णी लागल्याची समजतेय. मराठीतल्या 'मला आई व्हायचंय' या चित्रपटावर आधारित हा चित्रपट आहे. या सिनेमात क्रिती सॅनन आणि पंकज त्रिपाठी यांच्याही मुख्य भूमिका आहे. लक्ष्मण उतेकर यांनी याआधी लुका छुपी सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. हा त्यांचा दुसरा हिंदी सिनेमा आहे. सईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन सिनेमाचे शूटिंग सुरु करत असल्याची माहिती दिली. यात सईची कोणती भूमिका असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
सईने गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. तिने गेल्या काही वर्षांत अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते.
हिंदी शिवाय सई लवकर 'पाँडेचेरी' या मराठीत सिनेमातदेखील दिसणार आहे. या सिनेमात सईसह वैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी झळकणार आहेत. या सिनेमाचे बरेचसे शूटिंग पाँडेचेरीमध्ये करण्यात आले आहे. सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांनी या चित्रपटाची कथा लिहली असून हा एक कौटुंबिक विषयावर आधारित चित्रपट आहे.