सईचा पाऊट सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2016 12:17 IST2016-04-18T06:47:35+5:302016-04-18T12:17:35+5:30

         आपल्या दिलखुलास अंदाजाने तमाम तरुणांना घायाळ करणारी बोल्ड अ‍ॅन्ड ब्युटिफुल अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या चांगलीच ...

Sai Pott Selfie | सईचा पाऊट सेल्फी

सईचा पाऊट सेल्फी


/>         आपल्या दिलखुलास अंदाजाने तमाम तरुणांना घायाळ करणारी बोल्ड अ‍ॅन्ड ब्युटिफुल अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या चांगलीच फॉर्म मध्ये आहे. सईचे या वर्षात जवळपास सहा चित्रपट येत असुन ती सध्या कामात बरीच व्यस्त आहे. असे असुन देखील सई सोशल साईटवर मात्र अपडेट राहत असते. तीच्या आयुष्यातील बºयाच हॅपनींग गोष्टींची इन्फॉर्मेशन सईच्या चाहत्यांना सोशल साईट्स वरुनच मिळते. आता पहा ना सईने नूकताच एक फोटो सोशल साईट्स वर अपलोड केला असुन ़या फोटोला तिच्या चाहत्यांकडुन सुपरलाईक्स मिळत आहेत. आता या फोटो मध्ये असे काय आहे की सईचे चाहते या पिक वर अक्षरश: फिदा झाले आहेत. तर सईने एका छोट्याशा क्युट मुलासोबतचा निरागस फोटो क्लिक केला आहे. एवढेच नाही तर या दोघांनीही फोटोमध्ये झक्कास पोझ देत पाऊट सुद्धा केला आहे. कोण म्हणत की पाऊट करण्यात फक्त मुली पुढे आहेत. सईच्या या छोट्या हिरोने तर मस्त पाऊट करुन सगळ््या मुलींना पछाडले आहे. या दोघांच्या क्युट पाऊटला आमच्या कडुन देखील सुपरलाईक.

Web Title: Sai Pott Selfie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.