सही रे सई! अभिनेत्रीच्या हाती आणखी एक बॉलिवूड प्रोजेक्ट, 'डब्बा कार्टेल'मधून येणार भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 15:40 IST2025-02-17T15:39:29+5:302025-02-17T15:40:12+5:30
Actress Saie Tamhankar : २०२५ वर्षात सई तिच्या बॅक टू बॅक बॉलिवूड प्रोजेक्ट्स सोबत ती अनेक वेगळ्या धाटणीच्या भूमिका देखील करताना दिसतेय.

सही रे सई! अभिनेत्रीच्या हाती आणखी एक बॉलिवूड प्रोजेक्ट, 'डब्बा कार्टेल'मधून येणार भेटीला
अभिनेत्री सई ताम्हणकर(Actress Saie Tamhankar)ने वैविध्यपूर्ण भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. २०२५ वर्षात सई तिच्या बॅक टू बॅक बॉलिवूड प्रोजेक्ट्स सोबत ती अनेक वेगळ्या धाटणीच्या भूमिका देखील करताना दिसतेय. नुकतीच सई द सीक्रेट ऑफ शिलेदार्समध्ये दिसली होती आणि आता ती पुन्हा एक बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये दिसण्यासाठी सज्ज होत आहे.
द सीक्रेट ऑफ शिलेदार्सच्या दमदार यशानंतर सई ताम्हणकर पुन्हा बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये खास भूमिका साकारणार आहे. सईच्या लक्षवेधी भूमिका या नेहमीच बॉलिवूड प्रेक्षकांना मोहित करतात. अशातच सईची बहुचर्चित डब्बा कार्टेल वेबसीरिज या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डब्बा कार्टेलचा टीझर हा उत्सुकतावर्धक तर आहे पण यात गोष्ट आहे ती टिफीन सर्व्हिस चालवणाऱ्या मध्यमवर्गीय महिलांची. या महिला दिसायला साध्याभोळ्या असल्या तरीही त्या त्यांच्या टिफिन सर्व्हिसमधून मोठा स्कॅम करताना दिसतात. सई या वेबसीरिजमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
डब्बा कार्टेलनंतर सई आगामी क्राईम बीट या वेब सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे सई या वर्षात कायम वेगवेगळ्या भूमिका तर साकारत असून तिच्या प्रोजेक्ट्सचे विषय देखील तितकेच खास आहेत. धाडसी, महत्त्वाकांक्षी, निर्भय भूमिका करणारी सई येणाऱ्या काळात नक्की काय भूमिका साकारणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. सईचा बॉलिवूड प्रवास इथेच न थांबता येणाऱ्या काही दिवसात सई डब्बा कार्टेल, ग्राउंड झीरो, मटका किंग अश्या अनेक बॉलिवूड प्रोजेक्ट्समधून हिंदी आणि मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे.