सचिन खेडेकर आणि उषा नाडकर्णी 'रूस्तम' मध्ये एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 15:44 IST2016-07-01T10:14:52+5:302016-07-01T15:44:52+5:30

मराठी व बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये आपली जागा निर्माण करणारे कलाकार सचिन खेडेकर आणि उषा नाडकर्णी 'रुस्तम' या हिंदी चित्रपटातून एकत्र पाहायला मिळणार आहे. अभिनेते सचिन खेडेकर यांनी नेहमीच मराठी व बॉलीवुड इंडस्ट्रीला चांगल्या दर्जाचे चित्रपट दिले आहे. तर उषा नाडकर्णी यांनी तितक्याच वजनदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे

Sachin Khedekar and Usha Nadkarni together in 'Rustom' | सचिन खेडेकर आणि उषा नाडकर्णी 'रूस्तम' मध्ये एकत्र

सचिन खेडेकर आणि उषा नाडकर्णी 'रूस्तम' मध्ये एकत्र

 
राठी व बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये आपली जागा निर्माण करणारे कलाकार सचिन खेडेकर आणि उषा नाडकर्णी 'रुस्तम' या हिंदी चित्रपटातून एकत्र पाहायला मिळणार आहे.  अभिनेते सचिन खेडेकर यांनी नेहमीच मराठी व बॉलीवुड इंडस्ट्रीला चांगल्या दर्जाचे चित्रपट दिले आहे. तर उषा नाडकर्णी यांनी तितक्याच वजनदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. सचिन खेडेकर यांनी बादशाह, मुझसे दोस्ती करोगे, अग्नीपथ, सिंघम यांसारखे बिगबजेट चित्रपटात ते झळकले होते. तर मराठीमध्ये काकस्पर्श, मी शिवाजीराव भोसले बोलतोय यासांरखे सुपरहिट चित्रपटदेखील केले आहे. तर उषा नाडकर्णी यांनी छोटया पडदयापासून ते मोठया पडदयापर्यत ताकदवान भूमिका साकारल्या आहेत. असे हे दोन तगडे कलाकार आता अक्षयकुमारसोबत रूस्तम या बिगबजेट चित्रपटात झळकणार आहे. 


Web Title: Sachin Khedekar and Usha Nadkarni together in 'Rustom'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.