एस. नारायण यांना करायचेय कन्नड सैराटचे दिग्दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2016 12:35 IST2016-06-27T07:05:58+5:302016-06-27T12:35:58+5:30
सैराट चित्रपटाचा रिमेक चार भाषात होणार असून कन्नडमधील रिमेक बाबत वेगवान हालचाली घडत आहेत. अनेक चित्रपट कन्नडमध्ये रिमेक केलेल्या ...

एस. नारायण यांना करायचेय कन्नड सैराटचे दिग्दर्शन
विक्रम रविचंद्रन याने क्रेझी स्टार या चित्रपटात भूमिका करुन कन्नड चित्रपट विश्वात पदार्पण केले होते. पण अपेक्षित यश त्याला मिळाले नव्हते. सिनेमा क्षेत्रात नाव असलेल्या रविचंद्रन घराण्याला विक्रमसाठी सुपरहिट होऊ शकेल असा चित्रपट बनवायचा आहे. सैराटला मराठीत मिळालेल्या प्रचंड यशामुळे हाच चित्रपट त्याला मिळाला तर त्याचे भाग्य उजळू शकते. हाच विचार एस. नारायण यांनी केलेला दिसतो.
एस. नारायण यांनी 'सुर्य वंशा', 'सिम्हाद्रिया सिम्हा', 'मौर्या', 'चेलुविना चित्तारा' यासारखे हिट चित्रपट कन्नड भाषेत रिमेक केले आहेत. त्यांनी कन्नडमध्ये बनवलेले 'चैत्रदा प्रेमांजली' आणि 'विरप्पा नायका' हे चित्रपटही गाजले आहेत. सध्या 'पंता' आणि 'जेडी' या दोन चित्रपटाचेही ते दिग्दर्शन करीत आहेत.
थोडक्यात प्रतिभावान दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा वास्तववादी दृष्टीकोण एस. नारायण यांच्यात कितपत आहे हे काळच ठरवेल. एस. नारायण यांनी रॉकलाईन व्यंकटेश यांना सैराटच्या कन्नड रिमेकबद्दल संपर्क साधण्यात आल्याचे सांगण्यात येते. याविषयी बेंगळुरुमधील आघाडीच्या वर्तमानपत्रातही छापून आले आहे. तथापि रॉकलाई व्यंकटेश यांच्याकडून याविषयीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.