Ruturaj Gaikwad: आमचा भाऊ कसला भारी खेळला, वहिनी तुम्ही मॅच पाहिली का? ऋतुराजच्या विक्रमी खेळीवर सायली संजीवला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 16:56 IST2022-11-29T16:51:38+5:302022-11-29T16:56:56+5:30
ऋतुराज गायकवाड धमाकेदार खेळीनंतर नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा अभिनेत्री सायली संजीवच्या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत.

Ruturaj Gaikwad: आमचा भाऊ कसला भारी खेळला, वहिनी तुम्ही मॅच पाहिली का? ऋतुराजच्या विक्रमी खेळीवर सायली संजीवला सवाल
मराठमोळा क्रिकेटर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) सध्या खूप चर्चेत आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात ऋतुराजने महाराष्ट्राकडून खेळताना उत्तर प्रदेशविरूद्ध दुहेरी शतक झळकावले. चेन्नई सुपर किंग्जच्या या फलंदाजाने एकाच षटकात ७ षटकार ठोकून विश्वविक्रम केला. ऋतुराजने एकाच षटकांत नो-बॉलच्या साहाय्याने ४३ धावा कुटल्या. त्याच्या धमाकेदार खेळीनंतर नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev)ची आठवण झाली आहे.
ऋतुराज खेळीनंतर नेटकऱ्यांनी सायली संजीवला वहिनी मॅच बघितली का?, असा प्रश्न विचारला आहे. सायली संजीवने काल शेअर केलेल्या फोटोशूटवर लोकांनी ऋतुराजच्या विक्रमी खेळीनंतर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. आज आपल्या मित्राने ऋतुराज गायकवाड 6 6 6 6 6 6 6 सिक्स मारले 7 भारी बॅटिंग केली, मॅच बघितली का वहिनी, काय batting केलीय आमच्या भावाने, वहिनी आज मॅच बघितली का भाऊंची काय बॅटिंग केली आहे भाऊंनी अशा कमेंट्स केल्या आहेत.
सायली काही दिवसांपूर्वीच बस बाई बस’ या मंचावर अफेअरच्या चर्चां स्पष्टपणे उत्तर दिलं होते. सायली म्हणाली होती, ऋतुराज आणि तुषार देशपांडे माझे मित्र आहेत. ऋतुराजला माझी 'काहे दिया परदेस' ही मालिका आवडायची... असं जेव्हा त्यांनी मला सांगितले तेव्हा मलाच धक्का बसला की क्रिकेटपटू अशा मालिका पाहतात? असं ही सायली यावेळी म्हणाली.
सायली संजीवला खरी ओळख झी मराठीवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून मिळाली, तिची ‘गौरी’ ही व्यक्तिरेखा लोकांना खूप आवडली होती. तिला छोट्या पडद्यावर ‘परफेक्ट पाटी’, ‘गुलमोहर’ यांसारख्या मालिकेतून खूप यश मिळाले. अलीकडेच तिने ‘शुभमंगल ऑनलाइन’ या टीव्ही मालिकेत काम केले आहे. लवकरच तिचा गोष्ट एक पैठणीची सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.