विदेशी पॉलाचा पिंडदानमध्ये रोमान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2016 16:18 IST2016-05-02T10:48:16+5:302016-05-02T16:18:16+5:30

          हिंदी मराठी चित्रपटांमध्ये परदेशी हिरोईन्सची वर्णी लागणे ही काही आता फार मोठी गोष्टी वाटत ...

Romance in foreign policy | विदेशी पॉलाचा पिंडदानमध्ये रोमान्स

विदेशी पॉलाचा पिंडदानमध्ये रोमान्स


/>          हिंदी मराठी चित्रपटांमध्ये परदेशी हिरोईन्सची वर्णी लागणे ही काही आता फार मोठी गोष्टी वाटत नाही. आपल्याला अनेक बॉलीवुडच्या सिनेमांमध्ये या बाहेर जेशातून आलेल्या अ‍ॅक्ट्रेसचे जलवे पहायला मिळतात. ऐवढेच काय तर आता मराठी चित्रपटांची भुरळ देखील या परदेशी कलाकारांना पडत असुन त्यांनी आपली करिअरची गाडी मराठी इंडस्ट्रीकडे वळवीला आहे. आपला मराठी सिनेमा आज मोठा होतोय अन राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाऊन प्रेक्षकांची वाहवा मिळवतोय. सातासमुद्रापार पोहचलेला आपला मराठई चित्रपट ग्लोबल झाला अन परदेशी ताºयांना देखील मराठी सिनेमाची चाहुल लागली. आता पहा ना सिद्धार्थ चांदेकरची प्रमुख भुमिका असलेला पिंडदान हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. पिंडदान हे नावच विचार करायला लावणारे असुन ही एक प्रेमकथा आहे हे लवकर प्रेक्षकांच्या पचनीच पडत नाही. नूकतेच या सिनेमाचे एक पोस्टर आऊट झाले आहे यामध्ये सिद्धार्थ सोबत मनवा नाईक आणि ही परदेशी कलाकार दिसत आहे. याविषयी सीएनएक्सने सिद्धार्थशी संवाद साधला असता तो म्हणाला, या पोस्टरमध्ये दिसणारी ही तिसरी हिरोईन आहे पॉला मॅगलन. ती मुळची कॅनडाची असुन भारतात तीने फिल्म इंडस्ट्रीत बरेच काम केले आहे. पिंडदानमध्ये ती आमच्यासोबत असुन हा लव ट्रँगल कशाप्रकारचा आहे हे तुम्हाला लवकरच समजेल. 

             

Web Title: Romance in foreign policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.