रुपेरी पडद्यावर रंगणार टेबल टेनिस,मराठमोळी नम्रता गायकवाड दिसणार हटके भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 11:59 IST2017-12-02T06:29:32+5:302017-12-02T11:59:32+5:30
रुपेरी पडद्यावर आजवर विविध खेळांचं दर्शन रसिकांना झालं आहे. क्रिकेट, हॉकी, रनिंग, बॉक्सिंग, कुस्ती अशा खेळांवर आधारित सिनेमा रसिकांनी ...
.jpeg)
रुपेरी पडद्यावर रंगणार टेबल टेनिस,मराठमोळी नम्रता गायकवाड दिसणार हटके भूमिकेत
र पेरी पडद्यावर आजवर विविध खेळांचं दर्शन रसिकांना झालं आहे. क्रिकेट, हॉकी, रनिंग, बॉक्सिंग, कुस्ती अशा खेळांवर आधारित सिनेमा रसिकांनी डोक्यावर घेतले. खेळ प्रेमी अशी ओळख असलेल्या आपल्या देशात इकबाल, एम. एस. धोनी-द अनटोल्ड स्टोरी असे क्रिकेटवर आधारित सिनेमा जितके हिट ठरले तितकीच पसंती 'दंगल', 'चक दे' 'इंडिया', 'मेरी कॉम', 'सुलतान' या विविध खेळांवर आधारित सिनेमांनाही मिळाली. आता आणखी एका खेळाचं दर्शन रसिकांना रुपेरी पडद्यावर घडणार आहे. 'टेबल टेनिस' हा खेळ आता रुपेरी पडद्यावर रंगणार आहे.'बेधडक' या आगामी मराठी सिनेमात टेबल टेनिसचा खेळ रंगलेला पाहायला मिळेल.या सिनेमात अभिनेत्री नम्रता गायकवाड प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमात ती टेबल टेनिसपटूची भूमिका साकारणार आहे.नम्रताने आजवर कॅम्पस कट्टा, वंशवेल, विजय असो, लंगर, स्वराज्य अशा विविध सिनेमात आपल्या अभिनयाने छाप पाडली आहे. आता टेबल टेनिसवर आधारित या सिनेमात नम्रता हटके आणि वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळणार आहे. 'बेधडक' या सिनेमातील आपल्या या भूमिकेसाठी नम्रताने बरीच मेहनत घेतली आहे.खेळाडूप्रमाणे फिट दिसण्यासाठी तिने आपल्या फिटनेसवर बरेच कष्ट घेतले आहेत.त्यामुळे सिनेमातील नम्रताची ही भूमिका थोडी खास असणार आहे. सध्या या सिनेमाचं शूटिंग संपलं असून पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरु आहे.लवकरच हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येईल.
मराठीत नाटक, चित्रपट केल्यानंतर तिने थेट मल्याळम इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे.‘अयाल जिवीचीरीपुंड’ या मल्याळम सिनेमाच्या माध्यमातून दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतही आपल्या अभिनयाने छाप पाडली आहे.याविषयी नम्रातने सिएनएक्समस्तीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की,तांत्रिकदृष्ट्या मल्याळम चित्रपट इंडस्ट्री अधिक मजबूत असल्याचे जाणवले.आपल्याकडे कॅमेरा वापरण्याची पद्धत आणि तिकडची पद्धत वेगळी आहे.खूप पद्धतशीरपणे काम केले जाते,ज्यावेळेला शूटिंग सुरू होणार असेल त्याचवेळेस सुरू होते अन् पॅकअपही वेळेनुसारच केले जाते.कलाकार पूर्ण दिवस आपल्याबरोबर आहे म्हणून वेळ असेल तर दुसरा एखादा सीन किंवा मोन्टाज करणे हा प्रकार इथे मला दिसला नाही.ज्या दिवशी माझा एकच सीन असायचा तितकाच व्हायचा.शूटिंग चालू असताना काम एकदम शांततेत चालायचं,कुठे आरडाओरडा नाही की अपशब्दांचा मारा नाही.त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित व्हायचं.