आस्ताद काळे रेड अफेअर या चित्रपटात दिसणार राजकीय पुढाऱ्याच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2017 16:22 IST2017-05-23T10:52:31+5:302017-05-23T16:22:31+5:30
आस्ताद काळेने वादळवाट, असंभव, अग्निहोत्र यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या तो सरस्वती या मालिकेत झळकत आहे. सरस्वती या ...

आस्ताद काळे रेड अफेअर या चित्रपटात दिसणार राजकीय पुढाऱ्याच्या भूमिकेत
आ ्ताद काळेने वादळवाट, असंभव, अग्निहोत्र यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या तो सरस्वती या मालिकेत झळकत आहे. सरस्वती या कार्यक्रमात तो साकारत असलेली राघव ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. राघवचा मृत्यू झाला असल्याचे प्रेक्षकांना मालिकेत काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाले होते. पण आता राघव या मालिकेत परतणार आहे.
आस्ताद गेल्या अनेक वर्षांपासून मालिकांमध्ये काम करत आहे. मालिकेच्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढून त्याने नुकतेच एका चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे. तो प्रेक्षकांना लवकरच एका हिंदी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. रेड अफेअर या चित्रपटाद्वारे तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अरबाज खान, मंजिरी फडणीस, मुकूल देव, अश्मित पटेल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा म्हणजे एक मर्डर मिस्ट्री आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटासाठी आस्तादने डबिंग केले आहे. त्याच्या पहिल्या हिंदी चित्रपटासाठी तो खूपच उत्सुक आहे. रेड अफेअर या
चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी आस्ताद सांगतो, मी या चित्रपटात एका राजकीय पुढाऱ्याची भूमिका साकारत आहे. हा तरुणांचा नेता असून या चित्रपटातील माझी भूमिका खूपच इंटरेस्टिंग आहे. या चित्रपटात एक मर्डर मिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मी खुन केला आहे का असे तुम्हाला हा चित्रपट पाहाताना अनेकवेळा वाटणार आहे. कारण या चित्रपटात मी देखील एक संशयित आहे. हा चित्रपट आणि या चित्रपटातील माझी भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.