​क्रांती रेडकर रॉकी या चित्रपटात दिसणार पोलिसांच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2017 13:53 IST2017-07-22T08:23:37+5:302017-07-22T13:53:37+5:30

क्रांती रेडकरने जत्रा, माझा नवरा तुझी बायको, शहाणपण देगा देवा, खो खो, फक्त लढ म्हणा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले ...

In the role of police in the film Kranti Redkar Rocky | ​क्रांती रेडकर रॉकी या चित्रपटात दिसणार पोलिसांच्या भूमिकेत

​क्रांती रेडकर रॉकी या चित्रपटात दिसणार पोलिसांच्या भूमिकेत

रांती रेडकरने जत्रा, माझा नवरा तुझी बायको, शहाणपण देगा देवा, खो खो, फक्त लढ म्हणा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. काकण या चित्रपटाद्वारे तिने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. काकण या चित्रपटाचे समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही चांगलेच कौतुक केले. आता ती प्रेक्षकांना रॉकी या चित्रपटात दिसणार आहे.
रॉकी या चित्रपटात प्रेक्षकांना तिची एक वेगळीच भूमिका पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात ती पोलिसांच्या भूमिकेत दिसणार असून कल्पना ढोबळे असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. ती या चित्रपटात पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी ती खूपच उत्सुक असल्याचे कळतेय. या चित्रपटात तिच्यासोबत राहुल देवची देखील मुख्य भूमिका आहे. 
राहुलचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. त्याने याआधी अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकताच तो दिल बोले ऑबेरॉय या मालिकेतही झळकला होता.
‘रॉकी’ हा अ‍ॅक्शनपॅक्ड सिनेमा असून तो प्रेक्षकांना आवडेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच बॉलिवूड मधील प्रसिद्ध दिग्दर्शक व नृत्यदिग्दर्शक अहमद खानच्या हस्ते करण्यात आला. हा चित्रपट रसिकांचे फुल ऑन मनोरंजन करेल असा विश्वास व्यक्त करत अहमद खानने चित्रपटाला मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. रोमान्स, फॅमिली ड्रामा आणि अॅक्शन याचे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेल्या ‘रॉकी’ या सिनेमातून संदीप साळवे आणि अक्षया हिंदळकर हे फ्रेश चेहरे रुपेरी पडद्यावर पदार्पण करतायेत. या नव्या जोडीसोबत अशोक शिंदे, यतीन कार्येकर, गणेश यादव, विनीत शर्मा, स्वप्नील राजशेखर, दीप्ती भागवत या कलाकारांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

Also Read : ​रॉकी या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान राहुल देव झाला जखमी

Web Title: In the role of police in the film Kranti Redkar Rocky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.