रितेश देशमुखने दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2017 14:11 IST2017-02-19T08:40:32+5:302017-02-19T14:11:37+5:30

आज शिवजयंतीच्या शुभेच्छांनी सोशलमीडिया संपूर्णपणे रंगलेली दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्येक व्यक्ती ही शिवराजेच्या फोटोसहित छानसा संदेश देत ...

Ritesh Deshmukh wishes Shiv Jayanti to give | रितेश देशमुखने दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा

रितेश देशमुखने दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा

शिवजयंतीच्या शुभेच्छांनी सोशलमीडिया संपूर्णपणे रंगलेली दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्येक व्यक्ती ही शिवराजेच्या फोटोसहित छानसा संदेश देत शिवजयंतीच्या शुभेच्छा देत आहेत. यामध्ये प्रेक्षकांचे लाडके कलाकार तरी कसे मागे राहतील. आता हेच पाहा ना, आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अभिनेता रितेश देशमुख याने आधिराज्य गाजविले आहे. त्याने बॉलिवुड आणि मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनदेखील जिंकले आहे. अशा या प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकाराने सोशलमीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 
 
         एक मराठा लाख मराठा असा संदेश देत रितेशने ट्विटरच्या माध्यमातून त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. रितेशने ट्विटरवरुन शिवाजी महाराजांचे दोन फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या ट्विटमध्ये शिवाजी महाराज हे आयुष्यभरासाठीचे शौयार्चे धडा देणारे व्यक्तिमत्व असल्याचा उल्लेख त्याने केला आहे. तर तुमचा शत्रू कितीही ताकदवान असला तरी त्याला धैर्याने सामोरे जा, तुमची बाजू योग्य असेल तर तुमचा विजय नक्कीच होईल, असा संदेशही रितेशने दिले असल्याचे पाहायला मिळत आहे. 
 
            लवकरच प्रेक्षकांना आता रितेश देशमुख हा शिवरायांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तो आपली पत्नी-अभिनेत्री जेनेलिया देशमुखसह शिवाजी महाराजांवरील मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात बॉलिवुडचा दंबग सलमान खानदेखील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे. रितेशचा लय भारी हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तसेच तो मध्यंतरी रवि जाधव दिग्दर्शित बँजो या बॉलिवुड चित्रपटात पाहायला मिळाला. 

Web Title: Ritesh Deshmukh wishes Shiv Jayanti to give

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.