क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 16:51 IST2025-11-05T16:51:00+5:302025-11-05T16:51:30+5:30
रितेशच्या आईसाहेब आणि विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशाली देशमुख या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात. आता देखील त्यांनी कृत्रिम प्रकाशात ड्रॅगन फ्रूटची शेती केली आहे.

क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
देशमुख कुटुंबीय हे महाराष्ट्रातील लाडकं कुटुंब आहे. दिवंगत विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. त्यांची दोन मुलं राजकारणात सक्रिय आहेत. तर रितेश देशमुख हा सिनेइंडस्ट्रीत नाव कमावत आहे. रितेशच्या आईसाहेब आणि विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशाली देशमुख या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात. आता देखील त्यांनी कृत्रिम प्रकाशात ड्रॅगन फ्रूटची शेती केली आहे.
देशमुख कुटुंबाची सून आणि धीरज विलासराव देशमुख यांच्या पत्नी असलेल्या दीपशिखा देशमुख यांनी इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. दीपशिखा आणि धीरज देशमुख यांनी त्यांच्या मुलांसह वैशाली देशमुख यांनी कृत्रिम प्रकाशात ड्रॅगन फ्रूटचं पीक घेतलेल्या शेतात भेट दिली. या व्हिडीओत दिसतंय की बल्बच्या प्रकाशात त्यांनी ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन घेतलं आहे. याबाबत त्या नातवांना माहिती देत आहेत.
हा व्हिडीओ शेअर करत दीपशिखा देशमुख यांनी सासूबाईंचं कौतुक केलं आहे. "शेती करत असताना त्यात सातत्याने नवनवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न आदरणीय आई नेहमी करत असतात याचा आम्हाला खुप अभिमान वाटतो. बाभळगाव येथील शेतीमध्ये आईंनी कृत्रिम प्रकाशाच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रूट उत्पादनाची नवी संकल्पना राबवली आहे. वंश व दिवीयाना यांना याविषयी माहिती मिळावी यासाठी आम्ही प्रत्यक्षात तिथे भेट दिली. वंश व दिवीयाना यांना आजीमां व धिरज यांनी सविस्तरपणे माहीती दिली".
दरम्यान, दीपशिखा देशमुख या एक निर्मात्या आहेत. अनेक बॉलिवूड सिनेमांची निर्मिती त्यांनी केली आहे. बॉलिवूड अभिनेता जॅकी भगनानीच्या त्या मोठ्या बहीण लागतात. २०१२ साली त्यांनी धीरज देशमुख यांच्याशी विवाह केला. त्यांना वंश आणि दिवीयाना ही दोन मुलं आहेत.