Ved Marathi Movie: रितेश भाऊंनी बॉलिवूडच्या संजू बाबालाही ‘वेड लावलंय’...पाहा व्हिडीओ...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 15:37 IST2022-12-29T15:30:55+5:302022-12-29T15:37:42+5:30
Ved Lavlay Marathi song : रितेश देशमुखनं 'वेड लावलंय' या गाण्यावर आतापर्यंत अख्ख्या बॉलिवूडला नाचवलंय.

Ved Marathi Movie: रितेश भाऊंनी बॉलिवूडच्या संजू बाबालाही ‘वेड लावलंय’...पाहा व्हिडीओ...!!
रितेश देशमुख (Riteish Deshmukh) - जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांचा ‘वेड’ (Ved Marathi Movie) हा मराठी सिनेमा येत्या शुक्रवारी (३० डिसेंबर) प्रदर्शित होतो आहे. रिलीजआधीच या चित्रपटाने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. नुकताच या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग पार पडलं. त्यावेळी उपस्थित असलेल्या कलाकारांवरही या चित्रपटाने चांगलीच भुरळ घातली आहे. दरम्यान रितेशनं नुकताच एक इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
रितेश आणि जिनिलियाच्या वेडचं सिनेमातील गाणी रिलीज आधीच हिट झाली होती. यातील वेड लावलं या गाण्यानं तर संपूर्ण महाराष्ट्रालाच वेड लावलं. अगदी इंडस्ट्रीतल्या अनेकांना ‘वेड’च्या गाण्यांनी थिरकायला भाग पाडलं आहे. विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ तुम्ही बघायलाच हवा. अभिनेता संजय दत्त ‘वेड’च्या गाण्यावर थिरकतोय. रितेश देशमुखसोबत अभिनेता संजय दत्त हुक स्टेप्स करताना दिसतोय.
याआधी ‘वेड’च्या ‘वेड लावलंय’ या गाण्यावर बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी थिरकताना दिसलेत. विकी कौशन, अभिषेक बच्चन, अनन्या पांडेसह करण जोहर ही या गाण्यावर थिरकताना दिसला.
‘वेड लावलंय’ या गाण्यात रितेश आहे आणि सोबत भाईजान सलमानही आहे. ‘वेड लावलंय’ हे गाणं अजय गोगावणे आणि प्रसिद्ध गायक विशाल ददलानी यांनी गायलं आहे.