"सैराट झालं जी..." गाण्यावर थिरकली रिंकू, आर्चीच्या डान्सवरुन हटणार नाही नजर, चाहतेही म्हणाले- "एकदम झकास..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 13:39 IST2025-07-21T13:38:43+5:302025-07-21T13:39:25+5:30
इतक्या वर्षांनी 'सैराट झालं जी ...' या गाण्यावर रिंकू राजगुरूने डान्स केला आहे.

"सैराट झालं जी..." गाण्यावर थिरकली रिंकू, आर्चीच्या डान्सवरुन हटणार नाही नजर, चाहतेही म्हणाले- "एकदम झकास..."
आर्ची आणि परश्याची भन्नाट लव्हस्टोरी सांगणाऱ्या 'सैराट' सिनेमाने चाहत्यांना सैराट करून सोडलं होतं. नागराज मंजुळे दिग्दर्शित २०१२ साली 'सैराट' प्रदर्शित झाला होता. या सिनेमातील गाण्यांनी तर चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं होतं. चित्रपटासोबतच त्यातील गाणीही प्रचंड हिट झाली होती. आज इतक्या वर्षांनंतरही 'सैराट' सिनेमातील गाणी लोकप्रिय आहेत. एवढंच काय कित्येक कार्यक्रम आणि लग्नसमारंभातही ही गाणी वाजवली जातात. आता इतक्या वर्षांनी 'सैराट झालं जी ...' या गाण्यावर रिंकू राजगुरूने डान्स केला आहे.
रिंकूने तिच्या इन्स्टाग्रामवरुन "सैराट झालं जी..." गाण्यावरील डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये या गाण्यावर बिनधास्तपणे डान्स करताना दिसत आहे. "पहिलं ते पहिलच असतं...सैराट झालं जी" असं कॅप्शन तिने व्हिडीओला दिलं आहे. रिंकूचा डान्स व्हिडीओ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
'सैराट' सिनेमातूनच रिंकू राजगुरूने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. या सिनेमात आर्चीची भूमिका साकारून तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. त्यानंतर रिंकूने मागे वळून पाहिलं नाही. 'झिम्मा २', 'कागर', 'झुंड', 'आठवा रंग प्रेमाचा' अशा सिनेमांमध्ये ती झळकली आहे.