मेरे पास है तू मेरे साथ है! रिंकूने शेअर केला Video, दिसतेय कमालीची सुंदर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 15:26 IST2025-08-20T15:26:07+5:302025-08-20T15:26:36+5:30

रिंकूच्या या व्हिडीओवर अभिनेता स्वप्नील जोशीची कमेंट, म्हणाला...

Rinku Rajguru Shares Traditional Royal Look Video Viral Swapnil Joshi Comment Drew Attention | मेरे पास है तू मेरे साथ है! रिंकूने शेअर केला Video, दिसतेय कमालीची सुंदर!

मेरे पास है तू मेरे साथ है! रिंकूने शेअर केला Video, दिसतेय कमालीची सुंदर!

Rinku Rajguru Traditional Royal Look: नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या 'सैराट' (Sairat) या सिनेमाचं नाव घेतलं की पटकन डोळ्यासमोर येते ती म्हणजे आर्ची. सैराटमधून आर्ची अर्थात रिंकू राजगुरू(Rinku Rajguru) हिने सिनेविश्वात पदार्पण केलं. पहिल्याच सिनेमामधून ती प्रचंड लोकप्रिय झाली. रिंकूचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या प्रत्येक हालचालीकडे त्यांचे लक्ष लागलेले असते. रिंकूदेखील सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना अपडेट देत असते. ती चाहत्यांसाठी कायम नवनवीन पोस्ट घेऊन येत असते. यात अलिकडेच तिने एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओची सध्या तिच्या चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

रिंकू कधी वेस्टर्न तर कधी जीन्समध्ये दिसते. तिला प्रत्येक लूक भारीच दिसतो. आता रिंकूनं काळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केलाय. त्यावर तिनं गळ्यात भरजरी हार, केसांत गजरा, हातात काळ्या बांगड्या, कानात झुमके, कपालावर टिकली आणि बोरला मांग टीकाने तिचा लूक पूर्ण केलाय. यामध्ये ती अगदी महाराणीसारखी दिसतेय. रिंकूने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने 'नहीं सामने ये अलग बात है... मेरे पास है तू... मेरे साथ है…' असे लिहिले आहे.  तिच्या या हटके व्हिडीओनं चाहत्यांना घायाळ केलं आहेत.


विशेष म्हणजे रिंकूच्या या व्हिडीओवर अभिनेता स्वप्नील जोशीनं रेड हार्ट पोस्ट करत मॅडम असं लिहलं. तसेच अमृता खानविलकर हिनं 'फारच सुंदर' अशी कमेंट करत रिंकूच्या सौंदर्याचं कौतुक केलं. तर सुयश टिळकनं 'रॉयल' अशी कमेंट केली. रिंकूचा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीही त्याच्यावर लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे.  तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर  रिंकू लवकरच टॉलिवूड सिनेमातही दिसणार आहे. 'चिन्नी' या सिनेमातून ती साऊथ सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या सिनेमाचं शूटिंग सध्या सुरू आहे. अलिकडेच रिंकूच्या इंस्टाग्रामवरील चाहत्यांच्या यादीत लक्षणीय वाढ झालीये. १ मिलियन म्हणजे १० लाख चाहते सध्या रिंकूला इंस्टाग्रामवर फॉलो करत आहेत.

Web Title: Rinku Rajguru Shares Traditional Royal Look Video Viral Swapnil Joshi Comment Drew Attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.