"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...

By कोमल खांबे | Updated: July 28, 2025 09:15 IST2025-07-28T09:15:25+5:302025-07-28T09:15:54+5:30

रिंकूने सोशल मीडियावर Ask me सेशन घेतलं होतं. यामध्ये चाहत्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची रिंकूने उत्तरं दिली

rinku rajguru shared her relationship status reply to fan who is asking about is she single | "तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...

"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...

परश्या आर्ची अनेकांची क्रश आहे. रिंकू राजगुरू तिच्या दिलखेचक अदांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. अनेकदा रिंकू राजगुरूला तिच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला जातो. चाहत्यांनी अभिनेत्रीच्या पर्सनल लाइफबद्दल जाणून घ्यायला आवडतं. रिंकूने शेअर केलेल्या एका फोटोमुळे तिच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे अभिनेत्री नक्की कोणाला डेट करत आहे असा प्रश्न पडला होता. आता खुद्द रिंकूनेच ती सिंगल आहे की कमिटेड याचा खुलासा केला आहे. 

रिंकूने सोशल मीडियावर Ask me सेशन घेतलं होतं. यामध्ये चाहत्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची रिंकूने उत्तरं दिली. एका चाहत्याने रिंकूला थेट तिचं रिलेशनशिप स्टेटस विचारलं. "तू सिंगल आहेस का?" असा प्रश्न त्याने विचारला. चाहत्याच्या या प्रश्नालाही रिंकूने उत्तर दिलं. रिंकू म्हणाली, "हो". त्यासोबतच रिंकूला चाहत्याने "प्रेमावर विश्वास आहे का?" असंदेखील विचारलं. त्यालाही रिंकूने हो असं उत्तर दिलं. 

दरम्यान, रिंकूने या सेशनमध्ये तिच्या करिअरबद्दलही अपडेट दिले. रिंकू लवकरच टॉलिवूड सिनेमातही दिसणार आहे.'चिन्नी' या सिनेमातून ती साऊथ सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या सिनेमाचं शूटिंग सध्या सुरू आहे. 

Web Title: rinku rajguru shared her relationship status reply to fan who is asking about is she single

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.