Makeup Movie Teaser : रिंकू राजगुरुच्या मेकअपचा ट्रेलर पाहिलात का?, ही आहे ट्रेलरची खासियत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 13:16 IST2019-12-10T13:16:31+5:302019-12-10T13:16:35+5:30
Makeup Movie Teaser : एकदा पाहाच हा मेकअपचा दमदार टीझर.

Makeup Movie Teaser : रिंकू राजगुरुच्या मेकअपचा ट्रेलर पाहिलात का?, ही आहे ट्रेलरची खासियत
रिंकू राजगुरुच्या बहुचर्चित 'मेकअप' सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. या ट्रेलरमध्ये रिंकू राजगुरुचे एक वेगळेच रुप पाहायला मिळते. ट्रेलरमध्ये रिंकू साडीपासून ते वेर्स्टन आऊट फिटमध्ये दिसतेय. हर देवदास की गर्लफ्रेंड पारु नही होती असे संवाद रिंकू म्हणताना रिंकू ट्रेलरमध्ये दिसतेय.
रिंकूसोबत ट्रेलरमध्ये चिन्मय उद्गीरकरसुद्धा दिसतोय. मात्र तो यात कोणती भूमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मेकअपचा टीझर पाहून हा सिनेमा खूपच रंजक असल्याची प्रतिक्रिया चाहते देत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश पंडितने केले आहे. 7 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभिनेत्रींप्रमाणे रिंकू राजगुरूही सोशल मीडियावर खूप सक्रिय झाली आहे. फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच आपल्या फॅन्ससोबत शेअर करत असते. लवकरच मराठी नाटक पाहण्याची इच्छाही तिने व्यक्त केली आहे. मराठी रंगभूमीने अनेक दिग्गज कलाकार दिले आहेत.
रंगभूमी आणि नाटकातील अभिनयाने या कलाकाराच्या अभिनय कौशल्य आणखी समृद्ध केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनाही मराठी नाटक आणि रंगभूमीने मोहिनी घातली आहे. मराठी रंगभूमीवर काम केलेल्या कलाकारांच्या अभिनयात वेगळीच ताकद असते.
त्यामुळेच आर्ची अर्थात रिंकूलाही मराठी नाटक आणि रंगभूमीची भुरळ पडलीय. तिने मराठी नाटक लवकरच पाहावं आणि एखाद्या मराठी नाटकातून रंगभूमीवरही आपल्या अभिनयाची जादू दाखवावी अशीच इच्छा तिच्या फॅन्सची असेल.