रिंकू राजगुरू करतेय मराठमोळ्या अभिनेत्याला डेट?, अभिनेत्रीने नुकताच केला याबाबत खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 15:05 IST2022-02-14T15:03:02+5:302022-02-14T15:05:05+5:30
Rinku Rajguru: रिंकू राजगुरूने नुकतेच इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या रिलेशनशीपबाबत खुलासा केला होता.

रिंकू राजगुरू करतेय मराठमोळ्या अभिनेत्याला डेट?, अभिनेत्रीने नुकताच केला याबाबत खुलासा
सैराट (Sairat Movie) चित्रपटातून अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) घराघरात पोहचली. महाराष्ट्रात ती आर्ची या नावाने ओळखली जाते. सैराट चित्रपटानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिले नाही. अभिनेत्री रिंकू राजगुरू प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. काही दिवसांपूर्वी रिंकू अभिनेता आकाश ठोसरसोबत डिनर डेटला गेली होती. त्याच्यासोबतचे फोटो तिने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले. त्यानंतर तिचे त्याच्यासोबत अफेयर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र नुकतेच तिने इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या रिलेशनशीपबाबत खुलासा केला होता.
रिंकू राजगुरू सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तसेच ती या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. दरम्यान काही दिवसांपूर्वी रिंकू राजगुरू हिने इंस्टाग्राम स्टोरीवर चला गप्पा मारू म्हणत चाहत्यांसोबत संवाद साधला होता. त्यावेळी एका चाहत्यांने तिला तुझा प्रियकर कोण आहे असे विचारले होते. त्यावर तिने उत्तरात मी सिंगल आहे असे सांगितले. याचा अर्थ ती कोणत्या अभिनेत्याला डेट करत नाही आहे.
रिंकू सैराटनंतर मेकअप, कागर या मराठी चित्रपटात तर १००, अनपॉज्ड, २०० हल्ला हो या वेबसीरिजमध्ये पाहायला मिळाली आहे. त्यानंतर आता ती छुमंतर या मराठी चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती आकाश ठोसरसोबत झुंड या हिंदी चित्रपटातही दिसणार आहे.