रिंकू राजगुरूने फ्लॉन्ट केली ग्लॅमरस फिगर, फोटो पाहून चाहते झाले अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 19:05 IST2021-10-19T19:05:20+5:302021-10-19T19:05:44+5:30
रिंकूने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटोंतून ग्लॅमरस फिगर फ्लॉन्ट केली आहे.

रिंकू राजगुरूने फ्लॉन्ट केली ग्लॅमरस फिगर, फोटो पाहून चाहते झाले अवाक्
अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने मराठी सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आपले स्थान निर्माण केले आहे. तिने मराठी चित्रपटांसोबत हिंदी वेबसीरिजमध्ये काम केले आहे. शेवटची ती २०० हल्ला हो या वेबसीरिजमध्ये पहायला मिळाली. रिंकू राजगुरू सोशल मीडियावर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. तिने सैराट चित्रपटातून पदार्पण केले आहे. या चित्रपटानंतर आता रिंकूत खूप मोठा बदल झालेला पहायला मिळतो आहे. नुकतेच रिंकूने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर काही फोटोंच्या व्हिडीओतून ग्लॅमरस फिगर फ्लॉन्ट केली आहे.
रिंकू राजगुरूचा पिवळ्या रंगाच्या क्रॉप टॉपमधील फोटोंचा कोलाज असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर पहायला मिळतो आहे. या व्हिडीओत रिंकू राजगुरू फिगर फ्लॉन्ट करताना दिसते आहे. तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
रिंकू राजगुरूने सोशल मीडियावर फिटनेसचे व्हिडीओ किंवा फोटो शेअर करताना दिसते. याबद्दल ती सांगते की, फिटनेसला मी याआधी इतके महत्त्व कधीच दिलेच नव्हते. त्यावेळी आपली फिगर मेन्टेन असावी, आपण छान दिसावे असे वाटायचे नाही. पण जेव्हा याबद्दल जागरूक झाले त्यावेळी लक्षात आले की आपले वजन आवाक्याबाहेर चालले आहे. त्यामुळे फिटनेसकडे लक्ष दिले.
रिंकू राजगुरूच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचे तर ती मराठी चित्रपट छूमंतर आणि हिंदी चित्रपट झुंडमध्ये झळकणार आहे.