अरे बापरे... ऋचा इनामदारच्या खाण्यावर होती 'त्याची' नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 20:01 IST2019-04-10T19:59:44+5:302019-04-10T20:01:34+5:30
सध्या ऋचा इनामदार तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान ऋचाने तिच्या 'वेडींगचा शिनेमा' चित्रपटाच्या शूटिंग वेळी घडलेला एक विनोदी किस्सा सांगितला.

अरे बापरे... ऋचा इनामदारच्या खाण्यावर होती 'त्याची' नजर
सध्या ऋचा इनामदार तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान ऋचाने तिच्या 'वेडींगचा शिनेमा' चित्रपटाच्या शूटिंग वेळी घडलेला एक विनोदी किस्सा सांगितला.
चित्रपटात एक सीन आहे ज्यात शिवराज ऋचाला उचलून पायऱ्या चढून वर मंदिरात नेतो. हा सीन शूट करायच्या आधी दिग्दर्शकांनी शिवराजला विचारले होते की, तू ऋचाला उचलू शकशील ना? तेव्हा तर त्याने हो उत्तर दिले. पण त्यानंतर मात्र शिवराज माझ्यावर पाळत ठेऊनच असायचा. सीन शूट होईपर्यंत शिवराज मी जेवायला किंवा काहीपण खायला बसली की सेटवर कुठेही असला तरी माझ्याजवळ यायचा आणि मला सांगायचा "कमी खा गं, मला तुला उचलायचं".
एकतर मी खूप खवय्यी आहे. खाण्यावर माझे प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे न खाता तर मी राहूच नाही शकत. पण हा असं बोलल्यावर मात्र मी ओशाळायचे. असे तो अनेक दिवस करत होता नंतर मला समजले की तो असे बोलून माझी फिरकी घेत होता.
१२ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटातून ऋचा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भरपूर कौटुंबिक मनोरंजन देणाऱ्या या चित्रपटात मुक्ता बर्वे, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, भाऊ कदम, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे या बहुगुणी कलाकारांबरोबर शिवराज वायचळ या अभिनेत्यासोबत ऋचा स्क्रीन शेअर करणार आहे.