रेशम ‘जल की रानी है’…. पोहण्याची आवड आणि फिटनेस फ्रिक असलेल्या रेशमचा हा फोटो व्हायरल…

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 08:00 IST2018-10-01T13:43:01+5:302018-10-02T08:00:00+5:30

अभिनेत्री रेशम टीपणीसने 1993 साली अभिनेता संजीव सेठसोबत लग्न केले होते पण लग्नाच्या 11 वर्षानंतर 2004 साली ते वेगळे झाले. रेशम आणि संजीव यांना दोन मुले आहेत. त्यांची नावे आहेत रिशिका सेठ आणि मानव सेठ. रेशम टिपणीस हिची लेक रिशिका तिच्यासारखीच सुंदर आणि ग्लॅमरस  आहे.

Resham Tipnis Always A Water Baby, Says She Is Fitness Enthusiast | रेशम ‘जल की रानी है’…. पोहण्याची आवड आणि फिटनेस फ्रिक असलेल्या रेशमचा हा फोटो व्हायरल…

रेशम ‘जल की रानी है’…. पोहण्याची आवड आणि फिटनेस फ्रिक असलेल्या रेशमचा हा फोटो व्हायरल…

मराठी 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमधून पुन्हा एकदा रेशम सेठ-टिपणीस हे नाव मराठी रसिकांच्या चर्चेचा विषय बनलं. हिंदी आणि मराठी सिनेमा तसंच मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी रेशम मध्यंतरीच्या काळात तितकी चर्चेत नव्हती. मात्र बिग बॉस हा मराठी रिअॅलिटी शोमधील एंट्रीने रेशम पुन्हा रसिकांच्या मनात घर करुन गेली. त्यामुळेच की काय तिच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टी जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते.

मराठी बिग बॉसचा सीझन संपल्यानंतर रेशम लगेचच 'वस्त्रहरण' या नाटकाशी जोडली गेली आहे. या नाटकात ती एक लक्षवेधी भूमिका साकारत आहे. अभिनय क्षेत्रात यशस्वी ठरलेली रेशम तिच्या खासगी आयुष्यात फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. त्यामुळेच की काय वय वाढत असलं तरी आपल्या फिटनेसमुळे आजच्या अनेक अभिनेत्रींना ती कडवी टक्कर देते. 

रेशमच्या इन्सटाग्राम अकाउंटवर नजर टाकली असता आपल्याला कळून येईल की रेशम तिच्या फिटनेसबाबत जागरुक आहे आणि त्यामुळेच की काय रेशमचे सौंदर्य आजही अबाधित आहे. रेशमने वयाची 44 वर्षे पूर्ण केली आहेत तरीही तिच्या फोटोंकडे पाहिले असता तिच्या वयाचा अंदाज बांधणं कुणालाही शक्य नाही. फिट राहावं आणि सौंदर्य टिकून राहावं यासाठी रेशम बरीच मेहनत घेते. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोत ती स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळालं. या फोटोला तिने कॅप्शनही दिली होती. स्वतःला वॉटर बेबी म्हणत नेहमीच पोहायला आवडतं असं तिने या कॅप्शनमधून सांगितलं होतं. तिच्या या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.


अभिनेत्री रेशम टीपणीसने 1993 साली अभिनेता संजीव सेठसोबत लग्न केले होते पण लग्नाच्या 11 वर्षानंतर 2004 साली ते वेगळे झाले. रेशम आणि संजीव यांना दोन मुले आहेत. त्यांची नावे आहेत रिशिका सेठ आणि मानव सेठ. रेशम टिपणीस हिची लेक रिशिका तिच्यासारखीच सुंदर आणि ग्लॅमरस  आहे. रिशिकाचा इन्स्टाग्रामवर तिचे वेगवेगळ्या ग्लॅमरस अंदाजातले फोटो पाहायला मिळतात. आईप्रमाणेच रिशिकाही मॉडर्न विचारांची आहे. रिशिका मनमौजी आणि जीवनाचा पूर्ण आनंद घेणारी असल्याचे तिच्या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.

Web Title: Resham Tipnis Always A Water Baby, Says She Is Fitness Enthusiast