"चाहत्याने रक्ताने लिहिलेलं पत्र पाठवलं, तेव्हा...", रेणुका शहाणेंनी सांगितला 'तो' विचित्र अनुभव, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 17:08 IST2025-11-19T17:05:27+5:302025-11-19T17:08:07+5:30
९० च्या दशकात ज्यांनी एका हास्यावर संपूर्ण बॉलिवूडला भुरळ घातली अशा मराठमोळ्या अभिनेत्री म्हणजेच रेणुका शहाणे.

"चाहत्याने रक्ताने लिहिलेलं पत्र पाठवलं, तेव्हा...", रेणुका शहाणेंनी सांगितला 'तो' विचित्र अनुभव, म्हणाल्या...
Renuka Shahane: चेहऱ्यावरच्या सुंदर हास्यामुळे माणसाचं सौंदर्य आणखी खुलतं असं म्हटलं जातं. ९० च्या दशकात ज्यांनी आपल्या हास्याने संपूर्ण बॉलिवूडला भुरळ घातली अशा मराठमोळ्या अभिनेत्री म्हणजेच रेणुका शहाणे (Renuka Shahane). गेल्या अनेक वर्षांपासून मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत त्या सक्रिय आहेत. त्यांनी बॉलिवूडसह, टीव्हीवरही तितकंच काम केलं आहे. मात्र, रेणुका शहाणे हे मराठमोळं नाव खऱ्या अर्थाने 'सुरभि'मुळे चर्चेत आलं.
'सुरभि' हा एकेकाळी टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम होता. आज इतक्या वर्षानंतरही या कार्यक्रमाबद्दल बोललं जातं. भारतीय संस्कृती आणि देशातील विविध राज्यांविषयी माहिती देणारा हा परिपूर्ण कार्यक्रम १९९० मध्ये सुरु झाला. ‘सुरभि’ने १९९० ते २००१ ही जवळपास १० वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. नुकतीच रेणुका शहाणे यांनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. तेव्हा त्यांनी सुरभि दरम्यानच्या काही आठवणी शेअर केल्या. त्यावेळी एका चाहत्याने त्यांना चक्क रक्ताने लिहिलेलं पत्र पाठवलं होतं, असं त्या म्हणाल्या. तो किस्सा सांगताना रेणुका यांनी म्हटलं, " आज मला कितीतरी अशी लोकं भेटतात जे म्हणतात, तुम्ही आमचं पत्र वाचलंच नाहीत.तुम्ही आम्हाला कधीच विनर केलं नाहीत. त्यावेळी खूप पत्र असायची. त्याच्यात आमचा काहीच हस्तक्षेप नसायचा."
पुढे त्या म्हणाल्या,"त्याकाळात राजेश खन्नांबद्दल ऐकलं होतं. की बायका त्यांना आपल्या रक्ताने लिहिलेलं पत्र पाठवायच्या. तसं पत्र मलाही मिळालं आहे. ते पत्र पाहिल्यानंतर मला ना खूप असं वाटलं की हे काय आहे. कोणीतरी इतकं तुम्हाला आवडावं की तुम्ही त्यांना रक्ताने पत्र लिहिता. हे मला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. पण, सुरभीमुळे मला ते अनुभवायला मिळालं." अशी एक आठवण त्यांनी मुलाखतीत शेअर केली.