आर्चीच्या दहावीच्या परिक्षेमुळे 'मनसु मल्लिगे' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 15:34 IST2017-02-21T10:04:35+5:302017-02-21T15:34:35+5:30
नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. एवढेच नाही तर या चित्रपटाने जागतिक पातळीवरदेखील कौतुक ...
.jpg)
आर्चीच्या दहावीच्या परिक्षेमुळे 'मनसु मल्लिगे' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली
न गराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. एवढेच नाही तर या चित्रपटाने जागतिक पातळीवरदेखील कौतुक करण्यात आले. सैराटचे हे यश पाहता, प्रांतिक भाषेतील दिग्दर्शकदेखील या चित्रपटाच्या प्रेमात पडले. आता हेच पाहा ना, सैराट या चित्रपटाचा कन्नड भाषेतील रिमेकची खूपच चर्चा आहे. त्यांच्या या चित्रपटाचे नाव मनसु मल्लिगे असे आहे. या चित्रपटात प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आर्ची म्हणजे अर्थातच रिंकु राजगुरू झळकणार आहे. तिचा हा चित्रपट ९ फ्रेबुवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र दहावीच्या परीक्षेच्या अभ्यासात रिंकू बिझी असल्याने निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजत आहे. आता हा चित्रपट मार्च महिन्याच्या अखेरीस बॉक्सआॅफीस प्रदर्शित होणार आहे. रिंकूला नववीमध्ये ८४ टक्के गुण प्राप्त झाले होते. सैराट चित्रपटाच्या लोकप्रियतेनंतर रिंकूला शाळेत जाणे ही कठीण झाले होते. त्यामुळे रिंकूने दहावीचा १७ नंबरचा फॉर्म भरला होता. आता ती दहावीची बाहेरून परिक्षा देणार आहे. ७ मार्च ते २५ मार्च दरम्यान तिचे पेपर असणार आहेत. अशा पध्दतीने रिंकूला मार्च महिन्यात दोन परिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. एक दहावीची तर दुसरी बॉक्सआॅफीसची. चला तर पाहूयात रिंकू या दोन्ही परिक्षा आर्ची स्टाइलने पार पाडते का. आर्चीच्या मनसु मल्लिगे या चित्रपटातील गाणीदेखील सैराटमय आहेत. या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. सैराटचा हा कन्नड रिमेक सैराट प्रमाणेच प्रेक्षकांचे मनं जिंकतो हे पाहणे औत्स्युकाचे ठरणार आहे.