नात्यांचे बंध उलगडणारा मांजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2017 14:23 IST2017-01-14T14:23:28+5:302017-01-14T14:23:28+5:30
अश्विनी भावे यांची प्रमुख भूमिका असलेला मांजा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे टिझर पोस्टर ...
.jpg)
नात्यांचे बंध उलगडणारा मांजा
अ ्विनी भावे यांची प्रमुख भूमिका असलेला मांजा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे टिझर पोस्टर लाँच करण्यात आले. सोशलसाईट्सवर या पोस्टरला अनेक लाईक्स मिळत आहेत. बºयाच दिवसांनंतर अश्विनी भावे मराठी चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज झाल्या आहेत. मांजा या चित्रपटाचे दिग्दर्शक जतिन वागळे यांनी लोकमत सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीत या चित्रपटाचे काही पैलु उलगडले. जतिन सांगतात, हा चित्रपट नात्यांवर भाष्य करणारा आहे. आपण पतंग उडविताना मांजा हा प्रमुख घटक असतो. जर तुम्ही तो घट्ट पकडला तरी बोट कापु शकते आणि ढिल दिली तरी कापते. मग आपणच तो मांजा किती सैल सोडावा हे ठरविले पाहीजे. अशा प्रकारचे नात्यांचे बंध उलगडविणारा हा सिनेमा आहे. यामध्ये मी अश्विनी ताई शिवाय कोणाचाच विचार करु शकत नव्हतो. कारण यातील प्रमुख भूमिका ही अश्विनी भावेच उत्तन निभावू शकतात हा माझा विश्वास होता. त्यामुळे या चित्रपटासाठी मी त्यांना विचारले. जर त्यांनी होकार दिला नसता तर कदाचित हा सिनेमा मी केलाही नसता. कारण चित्रपट हा सुरु त्यांच्यावर होतो आणि संपतो देखील त्यांच्यावरच. मी माझ्या मागील तीन चित्रपटांसाठी अश्विनी भावे यांना विचारत होता. परंतू त्यावेळी काही जमलेच नाही. यावेळी मी त्यांना मांजाची कथा स्काईपवर ऐकवली त्यांना देखील ती आवडली. मग एक महिन्यासाठी त्या युएस वरुन इथे आल्या आणि आम्ही या सिनेमाचे चित्रीकरण केले असल्याचे जतिनने सांगितले. अश्विनी भावे यांचा अभिनय पुन्हा एकदा मोठ्या पडदयावर पाहण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना या चित्रपटाच्या निमित्ताने मिळाणार आहे.
![]()