शेवटच्या क्षणापर्यंत काम करत होत्या रिमा लागू, घरी गेल्या अन् काही वेळातच; शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 03:34 PM2023-05-18T15:34:09+5:302023-05-18T15:34:57+5:30

रिमा लागू यांच्या अकाली एक्झिटने मराठीच नाही हिंदी चित्रपटसृष्टीलाही धक्का बसला होता.

Reema lagoo death anniversary know unknown facts about actress | शेवटच्या क्षणापर्यंत काम करत होत्या रिमा लागू, घरी गेल्या अन् काही वेळातच; शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?

शेवटच्या क्षणापर्यंत काम करत होत्या रिमा लागू, घरी गेल्या अन् काही वेळातच; शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?

googlenewsNext

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रिमा लागू यांनी विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. त्यांच्या अकाली एक्झिटने मराठीच नाही हिंदी चित्रपटसृष्टीलाही धक्का बसला होता. बॉलिवूडमध्ये त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये साहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली. पण त्यांना प्रेमळ आईच्या भूमिकेने वेगळी ओळख मिळवून दिली. मराठीच्या बरोबरीने हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये भक्कम पाय रोऊन उभे राहणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये त्यांचा समावेश होत होता. 


ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांची आज पुण्यतिथी आहे. २०१७ मध्ये या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. रिमा लागू याांनी आपल्या करियरची सुरूवात मराठी चित्रपटातून केली होती. कित्येक वर्ष त्यांनी मराठी नाटकात काम केले. त्यानंतर त्यांनी बॉलिवूड व मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. रिमा यांनी हम साथ साथ है, कुछ कुछ होता है, मैंने प्यार किया व कल हो ना हो यांसारख्या चित्रपटात भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केलंय.

चित्रपटांशिवाय रिमा लागू खऱ्या आयुष्यात मॉर्डन आई होती. चित्रपटात काम करीत असताना त्यांची प्रसिद्ध मराठी अभिनेते विवेक लागू यांच्याशी भेट झाली. त्यानंतर काही वर्षांनंतर रिमा लागू व विवेक लागू यांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगी आहे जिचं नाव मृण्मयी आहे. मृण्मयी नाटक व चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे. यासोबत ती थिएटर दिग्दर्शकदेखील आहे. लग्नानंतर काही काळ सगळं सुरळीत चालू असताना रिमा व त्यांच्या नवऱ्यामध्ये मतभेद व्हायला लागले आणि अखेर काही वर्षांनंतर ते विभक्त झाले. 


रिमा लागू याांनी आपल्या करियरची सुरूवात मराठी चित्रपटातून केली होती. कित्येक वर्ष त्यांनी मराठी नाटकात काम केले. त्यानंतर त्यांनी बॉलिवूड व मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. रिमा यांनी हम साथ साथ है, कुछ कुछ होता है, मैंने प्यार किया व कल हो ना हो यांसारख्या चित्रपटात भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केलंय.


रिमा लागू मृत्यूच्या काही तास आधीपर्यंत शूट करत होत्या. संध्याकाळी त्या घरी परतल्या आणि  मध्यरात्री त्यांच्या छातीत दुखू लागले आणि  त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. रीमा लागू यांनी तिच्या कारकीर्दीत 95 हून अधिक चित्रपट काम केले आणि बर्‍याच टीव्ही कार्यक्रमांमध्येही त्या दिसल्या. तू तू मैं और श्रीमती या मालिका त्यांच्या हिट ठरल्या. आज भलेही रिमा आपल्यात नसल्या तरी, त्यांच्या दमदार अभिनयाने त्या आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत हे मात्र नक्की.

Web Title: Reema lagoo death anniversary know unknown facts about actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.